24 September 2020

News Flash

विस्तार परिणाम उज्ज्वल!

डिसेंबर महिन्याचे अतिथी विश्लेषक मनिष दवे हे चंपकलाल इन्व्हेस्टमेंट्स या दलाली पेढीत मिडकॅप विश्लेषक आहेत.

| December 1, 2014 07:25 am

av-06डिसेंबर महिन्याचे अतिथी विश्लेषक मनिष दवे हे चंपकलाल इन्व्हेस्टमेंट्स या दलाली पेढीत मिडकॅप विश्लेषक आहेत. ते सनदी लेखपाल असून त्यांना समभाग संशोधन व समभाग गुंतवणूक व्यवस्थापनाचा आठ वर्षांचा अनुभव आहे.
ल्ल शेषसायी पेपर अॅँड बोर्ड्स लिमिटेड या कंपनीची स्थापना १९६० साली झाली आणि १९६२ पासून व्यापारी उत्पादनास प्रारंभ झाला. ही कंपनी तामिळनाडू राज्यातील अश्विन उद्योगसमूहाचा एक भाग आहे. कंपनीची पल्प व पेपर मिल तामिळनाडू राज्यात इरोड येथे आहे. वार्षकि २० हजार टन क्षमतेने सुरु झालेल्या या कंपनीची सध्याची उत्पादनक्षमता एक लाख १५ हजार टनांपर्यंत पोहोचली आहे. कंपनी लिखाणाच्या कागदाची प्रमुख उत्पादक असून या व्यतिरिक्त आर्ट पेपर, क्राफ्ट पेपर, पेपर बोर्ड यांची उत्पादक आहे. कंपनी आपली उत्पादने स्प्रिंट, कलर िस्पट्र, इंडेक्स, स्प्रिंट प्लस, सक्सेस या नाममुद्रेने विकते. कागद उत्पादनाव्यतिरिक्त कंपनीने स्थावर मालमत्तेत मोठी गुंतवणूक केली आहे.
कंपनीची आíथक परिणामे उज्ज्वल असून १२.६१ कोटींच्या भागभांडवलावर कंपनीकडे ३७१.५२ कोटींची गंगाजळी आहे. कंपनीच्या भागभांडवलापकी ४३.४१ टक्के प्रवर्तकांचा वाटा आहे. त्या खालोखाल सरकारी विमा कंपन्या (जीवन+सामान्य विमा) १८.४० टक्के परकीय वित्तसंस्थांचा वाटा ३.०६ टक्के असून उर्वरित वाटा किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदारांचा आहे. चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने २५३.५४ कोटींच्या विक्रीवर ६.८७ कोटी निव्वळ नफा मिळविला आहे. मागील वर्षांपेक्षा आयकराची तरतूद ३५ टक्क्यांनी वाढूनही मागील वर्षांच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २०.६४ टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आíथक वर्षांत कंपनी प्रथमच एक हजार कोटी विक्रीचा टप्पा पार करण्याची व्यवस्थापनाला शक्यता वाटते.
आमच्या विश्लेषणाप्रमाणे कंपनी या वर्षी २७ कोटीचा नफा कमावेल. या वर्षीचे उत्सर्जन (ईपीएस) २१.४१ रुपये असेल. आíथक वर्ष २०१६ ची विक्री १,१३४ कोटी, नफा ३३ कोटी व उत्सर्जन २६.१६ रुपये अपेक्षित आहे. कंपनीच्या १ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बठकीत नियोजित विस्तार योजनेस (मिल डेव्हलपमेंट प्लॅन-२) मंजुरी दिली असून १५० कोटींच्या या विस्तार योजनेपकी १२० कोटी कर्जरूपाने तर ३० कोटी गंगाजाळीतून वापरले जाणार आहेत, असे कंपनीने मुंबई शेअर बाजारास कळविले आहे.
मूल्यांकन: पुढील एका वर्षांसाठी ४४५ चे लक्ष्य निर्धारित करून आम्ही खरेदीची शिफारस करीत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 7:25 am

Web Title: seshasayee papers and boards limited
टॅग Atithi Vishleshak
Next Stories
1 आधी मालमत्ता कर भरा आणि त्यानंतरच त्यावर वजावट मिळवा!
2 दानधर्म
3 सध्या गुंतवणुकीसाठी खुल्या म्युच्युअल फंड योजना
Just Now!
X