चमच्यांच्या स्टँडवर
सात चमचे होते
एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हुंदका फुटला
‘ती असती तर’ ते उद्गारले,
तो हरवला नसता
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेऊन
सहांच्या हुंदक्यात
सामील झालो
आणि पुटपुटलो;
खरं आहे, मित्रांनो
ती असती तर
मी हरवलो नसतो.
‘मुक्तायन’, कुसुमाग्रज
प्रत्येक गुंतवणूकदाराचा गुंतवणुकीचा एक परिघ असतो. या परिघातल्या सगळ्या कंपन्याचे शेअर एकाच वेळी गुंतवणुकीत असतातच असे नाही; परंतु त्या शेअरचा अंतर्मनात कुठेतरी मागोवा तो गुंतवणूकदार घेताच असतो. हा स्तंभ सुरु झाल्यानंतर आलेल्या पहिल्या पतधोरणाच्या निमित्ताने जानेवारी २०१२ मध्ये तीन राष्ट्रीयकृत व तीन नवीन खाजगी बँका अशा सहा बँकांची शिफारस केली होती.
३१ जानेवारी २०१२ ला बँक निफ्टीचा बंद भाव होता ९९१९.४५ आणि मागील आठवडय़ात बँक निफ्टीने १३४१४.३० या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला. आपल्या गुंतवणुकीत बँका व वित्तीय सेवा यांच्या शेअरचे प्रमाण २५% हून अधिक असेल तरच सेन्सेक्स  हवे. कारण कुठल्याही निर्देशांकात या क्षेत्राचा वाटा २५% हून अधिक आहे. जर जास्त धोका पत्करण्याची तयारी असेल तर प्रमाण ३०-३५% सुद्धा चालेल. त्यामुळे पोर्टफोलिओ परतावा वाढू व निफ्टीपेक्षा अव्वल परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीत वेळोवेळी सिंहावलोकन करून योग्य त्यावेळी शेअर विकून नफा कमविणे महत्वाचे असते.
आजच्या लेखाचे उद्दिष्ट आपापल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार शक्य तिथे नफा कमावणे व पुन्हा गुंतवणुकीच्या संधीची वाट पाहणे हे आहे. पुढील दोन महिन्यात बाजाराचा कल पाहून योग्य किंमतीला योग्य वाटतील त्या बँकांच्या शेअर मध्ये गुंतवणूक करावी. राष्ट्रीयकृत व खाजगी बँका (नवीन + जुन्या) मिळून एकूण २२ बँकांच्या वित्तीय निकालांचे विश्लेषण सात निकषांवर केले. या २२ बँका शेअर बाजारातील एकूण बँकिंग क्षेत्राच्या ८६% प्रतिनिधित्व करतात. येत्या वर्षभरात या सात बँका अव्वल परतावा  देऊ शकतील असा विश्वास वाटतो.
आधीच्या सहा बँकांमधून पंजाब नँशनल बँक, बँक ऑफ बडोदा यांची जागा कोर्पोरेशन बँक व बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकांनी घेतली आहे. येस बँकेची जागा जम्मू कश्मीर बँकेने घेतली आहे. या तीनही बदलाला पोर्टफोलिओमधून बाहेर जाणाऱ्या बँकांचे मुल्यांकन हेच कारण आहे. हे बदल कोणाला कदाचित पटणार नाही; परंतु या तीनही बँकांच्या भांडवल वृद्धीला तुलनेने मर्यादित वाव असल्यामुळे हा बदल केला आहे. या बँकांची निवड करताना व्याजाच्या फरकातील वाढीचा दर (क्रमांक-३), व्याजाशी तरतुदीपूर्व नफ्याचे प्रमाण, तरतुदीचे निव्वळ नफ्याशी प्रमाण हे तीन नफा तोटा पत्रकातील घटक, बाजार भावाचे पुस्तकी किंमतीशी गुणोत्तर, किमतीचे प्रतिसमभाग उत्सर्जनाशी प्रमाण (पीई) व एका वर्षांनंतर अपेक्षित किंमत हे सहा निकष वापरले आहेत.
या पकी स्टेट बँक, एचडीएफसी बँक व अ‍ॅक्सिस बँक या बँका पूर्ण मूल्यांकित आहेत या कारणाने त्यांच्या भांडवली वृद्धीला मर्यादित वाव आहे. त्यापेक्षा जास्त वाव बँक ऑफ इंडिया व युनियन बँक यांना आहे. (१५% हून अधिक) तर जम्मू कश्मीर बँक व कोर्पोरेशन बँक यांना त्याहून अधिक वाव आहे. परंतु या बँकाच्या गुंतवणुकीत जोखीमही जास्त आहे.
आजच्या लेखात शब्द मर्यादेमुळे अंर्तभाव नसलेल्या परंतु गुंतवणुकीस आश्वासक वाटणाऱ्या आणि त्यामुळे भविष्यात विचार करता येईल अशा बँका म्हणजे ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर.
स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूरच्या निव्वळ व्याजाच्या उत्पन्नात १५.५०% व निव्वळ नफ्यात ११.९९% वाढ झाली आहे. संख्यात्मक समान्य वाटणारा हा शेअर स्टेट बँकेबरोबर संभाव्य विलिनीकरणामुळे चच्रेत असतो. स्टेट बँकेने आपल्या दोन सहयोगी बँका स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंदोर यांचे आपल्यात विलीनीकरण केले.
वर्ष अखेपर्यंत स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूरबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. म्हणून हा शेअर गुणात्मकदृष्टय़ा खूपच उजवा वाटतो. एखाद्या सोमवारी या दोन बँकांच्या निकालाचे विश्लेषण करू.
स्टेट बँकेच्या निकालानंतर विश्लेषकांना संबोधित करताना बँकेच्या भांडवल वृद्धीबाबतचा निर्णय चालू आर्थिकवर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत होणे अपेक्षित असल्याचे अध्यक्षांनी प्रतिपादन केले. बाझल-३ची परिपूर्ती करण्यासाठी पुढील पाच वर्षांत स्टेट बँक समूहाला एक लाख कोटी भांडवलाची आवश्यकता भासणार आहे. पुढील वर्षांत स्टेट बँके सहित दोन चार राष्ट्रीयकृत बँका आपले हक्कभाग विक्रीस आणेल असे वाटते.
चालू आर्थिकवर्षांत ताळेबंद व नफा – तोटा पत्रक बॅसल-३ नुसार बनेल. म्हणून सर्वच बँकांनी मागील वर्षी तरतुदी करण्यात हात सल सोडल्याचे दिसते. नफा – तोटा पत्रक त्या नियमाच्या अधीन राहून तयार होतात ते नियम कायम असत नाहीत. त्यात बदल होत असतो. रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजाच्या उत्पन्नाचे वर्गीकरणात बदल केल्यामुळे (Accounting Treatment) मागील वर्षांचे व या वर्षीचे आकडे याचा तुलनात्मक निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.  
या सात बँकांच्या निकालांचे विस्तृत विवेचन पुढील भागात.

घोडा का अडला? भाकरी का करपली ? यापुढील प्रश्न व या प्रश्नांची उत्तरे सर्वानाच ज्ञात आहेत. बाजारात नफा कमवायचा तर भाकरी करपायच्या आधी परतायलाच हवी. मागील आठवड्यात बाजारात जे काही घडले त्याने हेच दाखवून दिले. निर्देशांक कुठपर्यंत वर जातील याबाबत मतमतांतरे असली तरी निर्देशांक वर नेण्यात बँकांच्या शेअरचे मोठे योगदान असेल यावर एकमत आहे. विविध सात निकषांवर अव्वल ठरलेल्या सात बँकांच्या वित्तीय निकालांचा हा आढावा दोन भागात.  गुंतवणुकीत समतोल राखण्यासाठी या सात बँकाचे आपल्या पोर्टफोलियोत एकत्रित मिळून २५%च्या आसपास प्रमाण असायलाच हवे.