02 June 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : तेजीचं तुफान उठलं रं! 

निर्देशांक सातत्याने टिकल्यास सेन्सेक्सवर ३७,७०० ते ३८,३०० आणि निफ्टीवर ११,२०० ते ११,४०० चा स्तर दृष्टिपथात येईल

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

गेल्या लेखात एक महत्त्वाचे सूचित होते. ते म्हणजे – ‘शुक्रवारचा साप्ताहिक बंद आश्वासक झाल्याने तसेच इतके दिवस मृतवत असलेले ‘ब’ वर्गातील (स्मॉल व मिड कॅप) समभागात तेजी अवतरल्याने पुन्हा एकदा सुधारणा अपेक्षित आहे. या सुधारणेचे वरचे लक्ष्य हे प्रथम सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० असे असेल. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास सेन्सेक्सवर ३७,७०० ते ३८,३०० आणि निफ्टीवर ११,२०० ते ११,४०० चा स्तर दृष्टिपथात येईल.’ याचा प्रत्यक्षात परिणाम होत असल्याचे आपण सरलेल्या शुक्रवारी अनुभवले.

या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स ३८,०१४.६२

निफ्टी ११,२७४.२०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा भरभक्कम आधार सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० असा असेल. हा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,१५० आणि निफ्टीवर ११,३५० असेल. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास फिरून निर्देशांक – सेन्सेक्सवर ३८,६५० आणि निफ्टीवर ११,५५० च्या स्तराला गवसणी घालताना दिसतील.

तिमाही निकालांचे विश्लेषण

हिरो मोटोकॉर्प –

या स्तंभातील २९ जुलैच्या लेखातील समभाग होता. हिरो मोटोकॉर्पचा बंद भाव त्यासमयी २,४६७ रुपये होता व वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर २,३५० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर २,३५० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २,६०० रुपये व त्या नंतर २,७५० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. हिरो मोटोकॉर्पचा प्रत्यक्ष निकाल अतिशय उत्कृष्ट असल्याने सहजगत्या २,७५० रुपयांचे इच्छित वरचे लक्ष्य १६ सप्टेंबरला २,७९४ रुपयांचा उच्चांक मारून साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अवघ्या दीड महिन्यांत ११ टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही दीड महिन्यानंतर, हिरो मोटोकॉर्पचा बाजारभाव (शुक्रवारचा बंद भाव) हा २,८४९ रुपयांवर आहे जो अगोदर उल्लेख केलेल्या वरच्या लक्ष्यासमीप आहे.

टाटा ग्लोबल बेव्हरेजेस –

त्याच लेखातील दुसरा समभाग टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेडचा बंद भाव त्यासमयी (२६ जुलै) २५८ रुपये होता. वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर २५० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर २५० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २६५ रुपये व त्या नंतर २८० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे निकालाअगोदरचे विश्लेषण होते. टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेडचा प्रत्यक्ष निकाल उत्कृष्ट असल्याने २८० रुपयांचे इच्छित वरचे लक्ष्य २९ ऑगस्टला २८२ रुपयांचा उच्चांक मारून साध्य केले. अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अवघ्या दीड महिन्यात ८.५ टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही दीड महिन्यानंतर, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेडचा बाजारभाव हा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे. समभागाचा शुक्रवारचा बंद भाव हा २६७ रुपये आहे. (क्रमश:)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 12:27 am

Web Title: share market trends senesex nifty abn 97 3
Next Stories
1 नावात काय? : ‘लेहमन क्रायसिस’ आणि आपण!
2 क.. कमॉडिटीचा : जा जा रे पावसा
3 अर्थ वल्लभ : विजयी वीर
Just Now!
X