News Flash

बहुगुणी, अल्पमोली

आदित्य बिर्ला समूहातील अग्रेसर कंपनी हिंदाल्को ही जगातील सर्वात मोठी अ‍ॅल्युमिनियम रोलिंग कंपनी असून आशियातील सर्वात मोठी अ‍ॅल्युमिनियमचे उत्पादन घेणारी कंपनी आहे. १९५८ मध्ये स्थापन

| February 25, 2013 01:32 am

आदित्य बिर्ला समूहातील अग्रेसर कंपनी हिंदाल्को ही जगातील सर्वात मोठी अ‍ॅल्युमिनियम रोलिंग कंपनी असून आशियातील सर्वात मोठी अ‍ॅल्युमिनियमचे उत्पादन घेणारी कंपनी आहे. १९५८ मध्ये स्थापन झाल्यापासून कंपनीने अनेक कंपन्या संपादित करीत आपला विस्तार प्रचंड मोठा वाढवीत नेला आहे. सर्वप्रथम इंडाल, त्यानंतर बिर्ला कॉपर, ऑस्ट्रेलियातील निफ्टी गॉर्डन कॉपर ही खाणकाम उद्योगातील कंपनी आणि पाच वर्षांपूर्वी नोव्हेलिस इन्क ताब्यात घेतल्यानंतर हिंदाल्को जगातील पहिल्या पाच मोठय़ा कंपन्यांमध्ये गणली जाते. भारताव्यतिरिक्त इतर १२ देशांतून कार्यरत असलेली हिंदाल्को ही फॉच्र्युन ५०० कंपन्यांच्या सूचीत गौरवास्पद जागा पटकावणारी एक मोठी कंपनी आहे.
युरो आणि अमेरिकेतील मंदीचा अपेक्षित परिणाम कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक निकषांवर दिसून आला आहे. परंतु येणारे आर्थिक वर्ष कंपनीसाठी चांगेल असेल. कारण आतापर्यंत केलेल्या भांडवली खर्चाचे सकारात्मक परिणाम आगामी कालावधीत दिसू लागतील. महान आणि उत्कल हे भारतातील दोन्ही प्रकल्प तसेच नोव्हेलिस ताब्यात घेतल्यानंतर प्रथमच त्याचा सकारात्मक परिणाम आता पाहायला मिळेल असे वाटते. सध्या पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी किमतीत उपलब्ध असलेला हा समभाग तुम्हाला फायदा मिळवून देईल हे नक्कीच. मग नजीकच्या काळावर भल्या-बुऱ्या अर्थसंकल्पाचे सावट का असेना!
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ३२.०६
परदेशी गुंतवणूकदार    २७.१६       
बँका / म्युच्युअल फंडस्    १४.७२
सामान्यजन  व इतर    २६.०६

हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
प्रवर्तक                आदित्य बिर्ला समूह
सद्य बाजारभाव             रु. १०७.०५
प्रमुख उत्पादन             अ‍ॅल्युमिनियम व तांबे इ.
भरणा झालेले भाग भांडवल          रु. १९१.४५ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा              ३२.०६ %
पुस्तकी मूल्य :  रु. १६४.५           दर्शनी मूल्य : रु. १/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)        रु. ९.७
प्राइस अìनग गुणोत्तर    (पी/ई)        ११.६ पट
मार्केट कॅपिटल : रु. १४,७४० कोटी    बीटा : १.६
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. १६५ / रु. १००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 1:32 am

Web Title: versatile low cost
टॅग : Arthvrutant
Next Stories
1 वित्त-तात्पर्य : दंडेलशाहीला चाप
2 कर मात्रा : ‘थकलेल्या’ पगारावर ‘रिलिफ’ निश्चित!
3 फंड-विश्लेषण : बॅलन्स फंड!
Just Now!
X