काही कंपन्यांचे शेअर हे आपल्याला कायम महाग वाटत राहतात; मात्र ते कायम वाढतच राहिल्याने नंतर आपण ते आधीच का नाही घेतले, अशी चुटपुट लागून राहते. एमआरएफ, आयशर मोटर्स, बॉश, टाईड वॉटर ऑइल, जिलेट अशा काही कंपन्यांच्या मांदियाळीत ३एम इंडिया या कंपनीच्या शेअरचादेखील समावेश व्हायला हवा. एखाद्या कंपनीच्या शेअरचा बाजार भाव जास्त असला याचा अर्थ तो शेअर महाग आहे असे नव्हे तसेच बाजारभाव कमी असलेले सगळेच शेअर स्वस्त असतात असेही नव्हे. या साठीच शेअरचे बाजार भाव आणि मूल्य यातला फरक कळायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर या कंपनीचे नाव गुंतवणूकदारांना माहितीचे असले तरीही सामान्य जनतेला कदाचित माहिती नसेल मात्र या कंपनीची उत्पादने पाहिल्यावर तुम्हाला ही कंपनी नक्की कळेल. आपण प्रत्येक जण ३एम  कंपनीचे एक तरी उत्पादन वापरत असू. मग ते स्कॉच ब्राइट असेल, ग्लू स्टिक असेल किंवा सेलो टेप असेल, पोस्ट— इट नोट पॅड असेल किंवा कदाचित तुमच्या डेंटिस्टनेदेखील तुम्हाला त्याचे एखादे उत्पादन उपचारा दरम्यान दिले असेल.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company profile for 3m india ltd
First published on: 16-01-2017 at 01:03 IST