एल जी बालकृष्णन अ‍ॅण्ड ब्रदर्स लिमिटेड

(बीएसई कोड ५००२५०)

jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?

arth05दक्षिण भारतात १९३७ मध्ये जी. बालकृष्णन यांनी स्थापन केलेली ही कंपनी. आज भारतातील रोलर चेन उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी म्हणून एल जी बालकृष्णनचे नाव घेतले जाते. गेल्या ८० वर्षांत कंपनीने रोलऑन या ब्रँडने चेन उत्पादनाचे पाच कारखाने स्थापन केले असून ते सर्व आयएसओ ९००१ आहेत, तसेच अमेरिकेतील अंडर-रायटर लॅबोरोटरीजने प्रमाण पत्रित केलेले आहेत. सध्या कंपनी सर्व म्हणजे हॉट, वॉर्म आणि कोल्ड फोर्जिग करते. गेल्या पंचवीस वर्षांपासून कंपनीने फाइन ब्लँक विभाग सुरू केला असून अनेक कंपन्यांच्या उत्पादनांच्या सुटय़ा भागांसाठी कंपनी उत्पादने करते. वाहन उद्योगाला पूरक सुटय़ा भागांचे उत्पादन आणि फोर्जिग करणाऱ्या या कंपनीचे सर्वात मोठी चेन उत्पादक म्हणून नाव घेतले जाते. या उत्पादनाच्या बाजारातील ७०% हिस्सा एलजीबीकडे आहे. भारतातील जवळपास सर्व वाहन कंपन्या म्हणजे दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी कंपन्या एलजीबीच्या ग्राहक आहेत. भारतातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीची उत्पादने अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही खंडात निर्यात होतात. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता राखण्याकरिता कंपनीने अमेरिकन कंपनीशी तांत्रिक करार केले आहेत. कंपनीचे नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र यंदाच्या वर्षांत पहिल्या सहामाहीपर्यंत कंपनीने समाधानकारक कामगिरी केलेली आहे. गेल्या तिमाहीसाठी कंपनीने २९५.२४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २१.१४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. यंदाच्या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठीदेखील कंपनी आपला आर्थिक प्रगतीचा आलेख कायम ठेवेल अशी आशा आहे. ७ फेब्रुवारीला कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होतील. नोटाबंदीचा काहीसा विपरीत परिणाम कंपनीच्या यंदाच्या तिमाही कामगिरीवर होऊ शकतो. त्यामुळे सध्या ५९५ च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर खाली आला, तर गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ती एक पर्वणी ठरू शकेल.

arth06सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.