‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे गेल्या काही दिवसांत अभिनेत्री जुई गडकरीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज घराघरांत तिला मालिकेतील सायली या नावाने एक नवीन ओळख मिळाली आहे. जुई इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स, स्टोरीज आणि व्हिडीओवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. परंतु, प्रेक्षकांच्या लाडक्या जुईला एका युजरकडून काहीसा विचित्र अनुभव आला आहे. या तरुणीने अभिनेत्रीला मेसेज करत धमकी दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊयात…

जुई गडकरीचे आजच्या घडीला इन्स्टाग्रामवर साडेतीन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आणि जुई एक सेलिब्रिटी असल्याने तिला सोशल मीडियावर प्रत्येकाला फॉलोबॅक करणं शक्य नाही. यामुळेच एका तरुणीकडून अभिनेत्रीला धमकी मिळाली आहे. राखी सुतार नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जुईला मेसेज करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.

हेही वाचा : “रुद्राज चार महिन्यांचा होता”, बाळंतिणीचा संसार घेऊन कोल्हापूरला गेलेली नम्रता संभेराव, नवऱ्याने ‘अशी’ दिली साथ

संबंधित तरुणी जुईला धमकीचे मेसेज करत लिहिते, “काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. तू फॉलो कर नाहीतर तुला जेल मध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण, आम्हाला वाटलं तू फॉलो करशील. पण, तू फॉलो केलं नाहीस आता तुला पोलिसात टाकेन…मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं कुठेही पळायचं नाही.”

हेही वाचा : महेश मांजरेकरांच्या चित्रपटाची चांगली सुरुवात, ‘जुनं फर्निचर’ने तीन दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या

जुईने संतप्त होऊन या मेसेजचे स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्री म्हणते, “हे मी सहन करू शकत नाही. आता थेट पोलीस स्टेशनला भेटूच मग आपण…राखी सुतार तू फेमस झाली. येच कर्जतला बघतेच मी पण!” दरम्यान, यापूर्वी देखील अनेक लोकप्रिय कलाकारांना अशाप्रकारचे अनुभव आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
jui gadkari
जुई गडकरी इन्स्टाग्राम स्टोरी

याशिवाय जुईच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये जुईसह अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दबडे, सागर तळाशीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.