जवळपास १०० वर्षांपूर्वी स्थापन झालेली हिंदुस्तान मीडिया ही कंपनी बिहार, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये पहिल्या क्रमांकाच्या वृत्तपत्राचे संचालन करीत असून भारतातील वृत्तपत्रसृष्टीत ते दुसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र आणि प्रकाशनगृह आहे. दिल्लीत आणि उत्तर प्रदेशातही हिंदुस्तानचा दुसरा क्रमांक आहे. गेल्या नऊ महिन्यांत आपला वाचक वर्ग ५८ लाखांनी वाढवणारा हिदुस्तान समूह जागरण या देशातील पहिल्या क्रमांकाच्या वृत्तपत्र समूहाला चांगलीच टक्कर देत आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने उत्तर प्रदेशात नवीन पाच ठिकाणाहून छपाई सुरू केली आहे. कुठल्याही वृत्तपत्र प्रकाशनाचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत जाहिरात असते आणि हिदुस्तान समूहाचे जाहिरातीद्वारे मिळणारे उत्पन्न येत्या काही वर्षांत चांगली वाढ दाखवेल अशी अपेक्षा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हिन्दी प्रकाशनाचे जाहिरात दर इंग्रजी प्रकाशनाच्या जाहिरातीच्या दरापेक्षा तब्बल ८० टक्क्य़ांनी कमी आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका, गावांतील वाढती साक्षरता, तसेच शहरीकरणाचा वेग, चांगल्या पावसाची अपेक्षा इ. बाबींमुळे हिन्दी भाषिक जाहिरातीचे दर वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०१५ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत १२% वाढ नोंदवून ती ६९१.०३ कोटींवर, तर नक्त नफ्यात ३१% वाढ नोंदवून तो १३३.६० कोटींवर गेला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांचे तसेच आगामी काळात कंपनीकडून उत्तम निकाल अपेक्षित असून मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हिंदुस्तान मीडिया सद्यभावात योग्य गुंतवणूक ठरेल.
stocksandwealth @gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindustan media ventures ltd profile
First published on: 23-05-2016 at 01:04 IST