‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या गुंतवणूकदार मार्गदर्शन मालिकेतील आगामी कार्यक्रम रविवारी, २४ जुलै रोजी सकाळी १०.४५ वाजता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, भोईवाडा, कल्याण योजण्यात आला आहे.
‘आर्थिक नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर आर्थिक नियोजनकार मिलिंद अंध्रुटकर, तर ‘म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर गुंतवणूकविषयकसल्लागार आणि ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभ लेखक वसंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून या उपक्रमांतून दिले जाणारे मार्गदर्शन उपस्थितांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिवाय आपले नेमके प्रश्न त्यांना तज्ज्ञांना विचारण्याची संधीही मिळेल. कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे.
: तज्ज्ञ मार्गदर्शक :
मिलिंद अंध्रुटकर आणि वसंत कुलकर्णी
Mutual fund investments are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arthasalla for investors held in kalyan
First published on: 18-07-2016 at 01:01 IST