वृत्तपत्र, नियतकालिके, इंटरनेट, रेडिओ तसेच टेलिव्हिजन अशा अनेकविध माध्यमांमध्ये ही कंपनी कार्यरत असून हा समूह ‘इंडिया टुडे’ समूह म्हणूनदेखील ओळखला जातो. तर लिव्हिंग मीडिया ही आदित्य बिर्ला समूहाची १९७५ मध्ये स्थापन झालेली एक अग्रगण्य माध्यम कंपनी असून तिचे मुख्यालय नोएडामध्ये आहे. टी व्ही टुडे या शेअर बाजारावर नोंद झालेल्या कंपनीअंतर्गत ‘आज तक’ हिन्दी वृत्त वाहिनी तर ‘इंडिया टुडे’ ही इंग्रजी वृत्त वाहिनी येते. आज हिन्दी वृत्त वाहिन्यांमध्ये ‘आज तक’ आघाडीच्या स्थानी तर गेली अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत इंडिया टुडे वाहिनीदेखील वाढत्या प्रेक्षकसंख्येमुळे चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या शिवाय कंपनीची दिल्ली आज तक आणि तेज या दोन वाहिन्यांदेखील बऱ्यापैकी चालल्या आहेत. ‘रेडिओ ओये’ या नावाने कंपनीची सात रेडिओ स्टेशन्स असून त्यापैकी जोधपूर, अमृतसर, पटियाला आणि शिमला येथील चार रेडिओ स्टेशन्स नुकतीच चार कोटी रुपयांना एंटरटेन्मेंट नेटवर्क इंडियाला विकली. उर्वरित तीन स्टेशन्सदेखील विकण्याचा कंपनीचा इरादा असून ती लवकरच विकली जातील अशी आशा आहे.
कुठलेही कर्ज नसलेल्या टी व्ही टुडे नेटवर्कने कायम चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद असणार नाही हे नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या तिमाही निकालावरून दिसून येते. जून २०१७ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने १५१.०७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २८.३७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो २७ टक्क्यांनी अधिक आहे.
उत्तम प्रवर्तक आणि केवळ १५च्या आसपास किंमत / उत्पन्न अर्थात पी/ई गुणोत्तर असलेली ही कंपनी मध्यमकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने आकर्षक वाटते.
सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
टीव्ही टुडे नेटवर्क लिमिटेड
(बीएसई कोड – ५३२५१५)
स्मॉल कॅप समभाग
प्रवर्तक : लिव्हिंग मीडिया, इंडिया टुडे समूह
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५७.४२
परदेशी गुंतवणूकदार ७.०६
बँक/ म्यु. फंड / सरकार ८.६२
इतर ८.६२
बाजारभाव (रु.) २८५
उत्पादन/ व्यवसाय प्रसारण
भरणा झालेले भागभांडवल (रु.) २९.८३ कोटी
पुस्तकी मूल्य (रु.) १०४.९
दर्शनी मूल्य (रु.) ५/-
लाभांश (%) ४० %
प्रति समभाग उत्पन्न (रु.) १८.२१
पी/ई गुणोत्तर १४.८३
समग्र पी/ई गुणोत्तर २९.३
डेट/इक्विटी गुणोत्तर ०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर ८१.४०
रिटर्न ऑन नेटवर्थ (%) १९.४
बीटा ०.७
बाजार भांडवल (कोटी रु.) १,६२२
५२ आठवडय़ातील उच्चांक/ नीचांक (रु.) ३६०/२११