डॉ. आशीष थत्ते
रोजच्या वापरात कित्येक वस्तू अशा कच्च्या मालापासून बनविल्या जातात की, तयार झाल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटते. जसे की, झाडाच्या सालापासून कागद तयार करणे. कच्चा मालाचे चांगल्या पक्क्या मालात रूपांतर करणे याला व्यवस्थापनात मूल्यवर्धन असे म्हटले जाते.
१ मे म्हणजे आंतरराष्ट्रीय श्रमिकांचा दिवस. कंपन्यांमध्ये सुट्टी देऊन किंवा श्रमिकांचे आभार मानून हा दिवस साजरा केला जातो. श्रमिकांचे काम बघायला गेलो तर मुख्यत्वेकरून कच्चा मालाचे चांगल्या पक्क्या मालात रूपांतर करणे अर्थात फक्त श्रमिक त्यात असतात असे नाही, पण यंत्रे, तंत्रज्ञान व इतर साधन सामुग्रीदेखील कार्य करत असते. याला व्यवस्थापनात मूल्यवर्धन असे म्हटले जाते. कित्येक वस्तू अशा कच्च्या मालापासून बनविल्या जातात की, तयार झाल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटते. जसे की, झाडाच्या सालापासून कागद तयार करणे, प्लास्टिकपासून बनणाऱ्या असंख्य वस्तू आहेत. सोने व हिरे यांना पैलू पाडणे म्हणजे खरे मूल्यवर्धन. लाकडाच्या वस्तू किंवा इतर शोभेच्या वस्तूदेखील अशाच मूल्यवर्धनाचा भाग आहेत. मूल्यवर्धन केल्यामुळे कंपन्यांना त्यांचे ग्राहक वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे अर्थातच विक्री आणि नफा वाढतो. मूल्यवर्धन म्हणजे खरेतर व्यय व विक्री किंमत या दोहोंमधील वाढणारा फरक असतो. यात अगदी नाममुद्रा (ब्रँड) देऊनसुद्धा मूल्यवर्धन करता येते. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे या साखळीत श्रमिकांना म्हणजे जे मूल्यवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यांना फारच कमी मोबदला मिळतो. श्रमिकांना १ मे रोजी महत्त्व असते. कारण या मूल्यवर्धन करणाऱ्या श्रमिकांना कमीत कमी एक दिवस तरी महत्त्व द्यावे असा त्यामागे एक विचार होता.
घरात पालक किंवा मेथीसारख्या पालेभाज्या नुसत्या खा असे घरच्या गृहिणीने सांगितले तर? मासे किंवा चिकन कुठलीही प्रक्रिया न करता खाणे शक्य नाही. म्हणजे घरातील गृहिणीदेखील मेहनत घेऊन मूल्यवर्धन करतात. त्याचा गुणविशेष चव असतो. पुरणपोळी, कोथिंबीर वडी, बिर्याणी वगैरे पदार्थ किती साध्या पदार्थापासून बनवतात, पण मूल्यवर्धनाने त्यांची चव निश्चित वाढते. विक्री किंवा नफा वाढत नाही. कारण ते पदार्थ आपण खातो. मात्र श्रमिकांच्या श्रेणीमध्ये त्यांचादेखील समावेश असतो. मुख्य म्हणजे त्या कुठला पगारदेखील घेत नाहीत. देशाचे माननीय मुख्य न्यायमूर्ती रामण्णा यांनी २०२१ मध्ये अपघाताच्या दाव्यात निकाल देताना गृहिणी कुठलेही आर्थिक मूल्यवर्धन करत नाहीत हा विचार बदलण्याची गरज असल्याचे नमूद केले होते व त्याचा मोबदलादेखील ग्राह्य धरला होता.
निरस वाटणारा प्रत्येक दिवस काहीतरी चांगले करून आपणदेखील मूल्यवर्धन करत असतो. १ मे रोजी गृहिणींचादेखील दिवस असतो. मूल्यवर्धनाच्या निमित्ताने त्यांचेदेखील कौतुक!
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत
ashishpthatte@gmail.com

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”