किफायतशीर ‘अल्प बिटा’!

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (बीएसई कोड – ५४०६७८)

|| अजय वाळिंबे

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३६९.२५

वर्ष १९७२ मध्ये स्थापन झालेली कोचीन शिपयार्ड (सीएसएल) ही ‘नवरत्नां’पैकी एक सरकारी कंपनी. भारतातील ती एक अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आणि दुरुस्ती यार्ड मानली जाते. १९८२ मध्ये सीएसएलने जहाज दुरुस्तीचे काम सुरू केले. तेल संशोधन उद्योगातील जहाजांची श्रेणीसुधारणा तसेच नेव्ही, यूटीएल, तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय आणि पोर्ट ट्रस्टच्या जहाजांची वेळोवेळी दुरुस्ती व आयुष्यमान वाढवण्यासह सर्व प्रकारच्या कामांना तिने सुरुवात केली. गेल्या तीन दशकांत सीएसएल भारतीय शिपबिल्डिंग आणि शिप रिपेयर उद्योगात अग्रदूत म्हणून उदयास आली आहे. हे यार्ड भारतातील सर्वात मोठी जहाज तयार आणि दुरुस्ती करू शकते. सीएसएल ११०,००० डीडब्ल्यूटीपर्यंत आणि १२५,००० डीडब्ल्यूटीपर्यंत दुरुस्ती करणारी जहाजे तयार करू शकते. देशांतर्गत व्यवसायाखेरीज कंपनीने युरोप आणि मध्य पूर्वमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपन्यांकडून जहाजबांधणीच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. कंपनीला देशातील पहिले स्वदेशी हवाई संरक्षण जहाज तयार करण्यासाठी नामित केले आहे. भारताच्या सर्वोच्च १० सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक म्हणून, सीएसएलला भारत सरकारकडून, ‘एमओयू’प्रणाली अंतर्गत यार्डसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट मिळवण्यासाठी सलग चार वेळा उत्कृष्ट मानांकन देण्यात आले आहे.

गेली काही वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून कंपनीवर अत्यल्प कर्ज आहे. करोना महामारीचा कंपनीच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला असला तरीही निकाल अपेक्षेनुसार आहेत. मे पासून ५० टक्के क्षमतेवर कामकाज असूनही कंपनीने सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ६५७.४० कोटी (गेल्या वर्षी ९७२.८७ कोटी) रुपयांच्या उलाढालीवर १०८.३६ कोटी (२०७.५७ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. आगामी वर्षांत कंपनी व्यवस्थापनाला उत्तम कामगिरी अपेक्षित असून ३,४०० कोटी रुपये उलाढालीचे लक्ष्य ठेवले आहे. १३,८६२ कोटी रुपयांचे ऑर्डर बुक असलेल्या या कंपनीकडे १,४०० कोटी रुपयांची रोख गंगाजळी आहे. अल्प बिटा असलेला हा शेअर ३७० रुपयांना उपलब्ध आहे. वर्षभराची गुंतवणूक २५ टक्के परतावा देऊ शकेल.

नफावसुली करावी!

आपल्या ‘पोर्टफोलियो’वर गुंतवणूकदारांचे सातत्याने लक्ष असणे आवश्यक असते. त्यामुळे योग्य वेळी निर्णय घेऊन ‘स्टॉप लॉस’ किंवा ‘बुक प्रॉफिट’ ही स्ट्रॅटेजी वापरता येते आणि पोर्टफोलियो सुरक्षित राहतो. यंदाच्या वर्षांत ‘माझा पोर्टफोलियो’ या सदरामध्ये सुचविलेल्या शेअर्सपैकी बहुतांश शेअर्स नफ्यात असले तरीही पुढील पाच कंपन्यांचे शेअर्स मात्र अत्यल्प काळात (१० महिन्याहून कमी कालावधीत) दुपटीहून अधिक वर गेले आहेत :

कंपनीचे नाव शिफारस तारीख शिफारस भाव (रु.) सध्याचा भाव २७ नोव्हें. नफा %कंपनीचे नाव शिफारस तारीख शिफारस भाव (रु.) सध्याचा भाव २७ नोव्हें. नफा %थायरोकेयर टेक्नॉलॉजी १३.०१.२०२० ५२७ १०९९ १०८.६०सीडीएसएल २५.०५.२०२० २३५ ४९० १०८.४० अ‍ॅडव्हान्स्ड एंझाइम टेक ०८.०६.२०२० १५६ ३५४ १२६.८०अ‍ॅफल इंडिया २२.०६.२०२० १४७८ ३४२० १३१.४अपोलो पाइप २७.०७.२०२० ३१४ ६५९ १०९.८ज्या भाग्यवान आणि हिंमतवान वाचक गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल ते यातील ५० टक्के शेअर्स विकून अल्पावधीतच चांगला नफा (अर्थात करपात्र) कमावू शकतील.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cochin shipyard limited bse code 540678 mppg

ताज्या बातम्या