गेल्या काही महिन्यांत आलेल्या काही चांगल्या ‘आयपीओ’पैकी एक म्हणून गोदरेज अ‍ॅग्रोवेटचा उल्लेख करता येईल. पशुखाद्य, पीक संरक्षण, पाम तेल, डेअरी आणि पोल्ट्री तसेच खाद्यान्न प्रक्रिया अशा विविध व्यवसायांत असलेली सुप्रसिद्ध गोदरेज समूहाची ही कंपनी. गोदरेज अ‍ॅग्रोवेट प्रत्येक व्यवसायात अग्रणी असून संघटित क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. पशुखाद्य व्यवसायात संघटित क्षेत्रात गोदरेज अ‍ॅग्रोवेटचा वाटा २२ टक्के आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे कंपनीला पाम तेल व्यवसायासाठी चार मंडल जमीन नुकतीच देण्यात आली असून त्यामुळे कंपनीचे पाम लागवडीचे क्षेत्र वाढेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्कात दुपटीने केलेली वाढ (१५ टक्के ते ३० टक्के) कंपनीच्या पथ्यावर पडेल. सोयाबीन, कापूस, मिरची यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असून त्याकरिता कंपनीने यंदा देशभरात चाळीस कार्यक्रम आखले आहेत. डिसेंबर २०१८ साठी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष जाहीर झाले असून कंपनीने ८६५.७७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४.४२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godrej agrovet ltd
First published on: 19-02-2018 at 05:06 IST