वसंत कुळकर्णी

अनेक गुंतवणूकदार आपला जोखिमांक समजावून न घेता समाजमाध्यमावर मिळणाऱ्या ‘स्टॉक टिप्स’ आणि सुरत, इंदूरसारख्या शहरांतून फोनद्वारे मिळालेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करतात. या अवैध प्रवृत्तीवर ‘सेबी’ने या आधीच आसूड ओढायला हवे होते. पण आता तरी त्या दिशेने नियामकांची पावले कशी वळली आहेत..? 

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

धर्माची व्याख्या विद्वानांनी ‘धारयति इति धर्म:’ अशी केली आहे. 

धृति: क्षमस्व दमोस्त्यं सौचामिंद्रियानिग्रह: । धीरविद्या सत्यमक्रोधो, दशकम धर्मलक्षणम् ।

(धृती (संयम), क्षमा (इतरांनी केलेले अपराध पोटात घालणे), दम (भावनांवर नियंत्रण ठेवणे), अस्तेय (चोरी न करणे), शौच (आंतरिक आणि बाह्य स्वच्छता), इंद्रिय निग्रह (इंद्रियांवर नियंत्रण), धी. (बुद्धीचा वापर), विद्या (ज्ञानाची आस), सत्य (मन, वचन, कर्म याद्वारे सत्याचे पालन) आणि अक्रोध (क्रोधावर नियंत्रण); ही मानवी धर्माची दहा वैशिष्टय़े आहेत.)

भांडवली बाजाराची नियामक ‘सेबी’ने अलीकडे (रिसर्च अ‍ॅनालिस्ट) ‘आरआयए’ आणि ‘एमएफडी’ यांचा धर्म कोणता आणि त्यांनी आपआपल्या धर्माचे पालन कसे करावे, या बाबतीत नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे. ‘सेबी नोंदणीकृत संशोधन विश्लेषक (रिसर्च अ‍ॅनालिस्ट)’ संदर्भात ‘सेबी’ने अलीकडेच दिलेल्या एका निर्णयाची दखल घेणे आवश्यक वाटते.

अमित जेसवानी (स्टॅलियन अ‍ॅसेट) यांच्याविरुद्ध एक मनोरंजक (आणि वादग्रस्त) आदेश सेबीने दिला आहे. अमित जेसवानी यांना २८.६ लाखाचा दंड भरण्याचा आदेश देताना, या आदेशात नोंदणीकृत संशोधन विश्लेषक हे आदर्श पोर्टफोलिओ (मॉडेल पोर्टफोलिओ) किंवा गुंतवणूक सल्ला देऊ शकत नाहीत, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. रिसर्च अ‍ॅनालिस्ट हे गुंतवणूकविषयक सल्ला देऊ शकत नाहीत हे सर्वज्ञात असले तरी,  आरआयए (सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार) यांची कर्तव्ये (धर्म) ‘सेबी’ने अधोरेखित केला आहे, तो काय आणि कसा हेही पाहिले पाहिजे. खरे तर प्रत्येकाने पाळावयाच्या त्याच्या त्याच्या धर्माची उजळणी यानिमित्ताने करायला हवी.

संशोधन विश्लेषकाचा धर्म ?

संशोधन विश्लेषक कंपन्या आणि उद्योगांचा अभ्यास करतो. उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करतो आणि त्या उद्योगात गुंतवणूक करावी किंवा कसे आणि करायची असेल तर कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी किंवा कोणत्या कंपनीचे शेअर्स विकावे या बाबतीत त्याने आकडेवारीवर आधारित अंदाज किंवा शिफारसी करणे अपेक्षित असते. संशोधन विश्लेषकाची एखादी गुंतवणुकीची शिफारस एखाद्या गुंतवणूकदाराच्या जोखिमांकनाला साजेशी नसेल, अशी शक्यताही आहे. परंतु त्या विश्लेषकाला गुंतवणूकदाराच्या जोखिमांकनाची कल्पना असेलच असे नाही.

विश्लेषकांच्या अशा शिफारशी अनेक वेळा गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण करतीलच, असे नसल्याने गुंतवणुकीच्या निर्णयाचा परिणाम गुंतवणूकदारावर होण्याची शक्यता असते. ‘सेल-साइड अ‍ॅनालिस्ट’ जे संस्थात्मक गुंतवणूकदार, इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेवा प्रदाते यांच्यासाठी असतात. तर ‘बाय-साइड अ‍ॅनालिस्ट’ हे म्युच्युअल फंड, हेज फंड, पेन्शन फंड किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर्स यांच्यासाठी काम करतात.  जे त्यांच्या स्वत:च्या गुंतवणुकीसाठी किंवा इतरांच्या वतीने समभागांची खरेदी आणि विक्री करतात अशा निधी व्यवस्थापकांसाठी ‘‘बाय-साइड विश्लेषक’’ याव्यतिरिक्त ‘स्वतंत्र विश्लेषक’ (इंडिपेंडंट अ‍ॅनालिस्ट) कार्यरत असतात. म्हणजे संशोधन प्रवर्तक किंवा गुंतवणूक समुदायासाठी किंवा पूर्ण-सेवा गुंतवणूक संस्थांसाठी ते काम करतात.

या समुदायातील संशोधन विश्लेषकांचे नियमन करण्यासाठी ‘आरआयए रेग्युलेशन’ आणले गेले. विनियम २(५) नुसार, संशोधन संस्था म्हणजे ‘सेबी नोंदणीकृत मध्यस्थ’ जो मर्चंट बँकिंग किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा ब्रोकरेज सेवा किंवा अंडररायटिंग सेवांमध्ये आहे आणि त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीं संशोधन अहवाल किंवा संशोधन विश्लेषण स्वत:च्या नावाने जारी करतो. संशोधन विश्लेषक आणि संशोधन अहवाल किंवा संशोधन विश्लेषण जारी करण्यात गुंतलेल्या इतर मध्यस्थांचा समावेश आहे. विश्लेषक थेट गुंतवणूकदारांना आपल्या शिफारसी विकू शकत नाही.

माध्यमातील चर्चानुसार, या आदेशाचा मॉडेल पोर्टफोलिओ विकणाऱ्या ‘स्मॉलकेस’सारख्या मंचावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासारखे मंच हे गुंतवणूकदारांसाठी संशोधन विश्लेषकांनी तसेच गुंतवणूक सल्लागारांनी तयार केलेले ‘क्युरेटेड पोर्टफोलिओ’ विकतात, ते गैर असून ‘आरआयए रेग्युलेशन’च्या विरोधी आहे असे मत नोंदवत या आदेशात – ‘अर्जदाराने (अमित जेसवानी) प्रामाणिकपणे आणि सदभावनेने काम केले नाही’ आणि ‘योग्य आचार मानकांचे पालन आणि योग्य प्रक्रियांचे पालन केले नाही,’ असे सेबीने निरीक्षण नोंदविले आहे.

भारतातील किरकोळ डिमॅट खाती ६.५ कोटींच्या जवळपास वाढली आहेत आणि गेल्या काही तिमाहीत जोडलेले बहुतेक वैयक्तिक गुंतवणूकदार हे प्रथमच गुंतवणूक करणारे आहेत, ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. नियमन केलेल्या संस्था किंवा गैर कंपनी सल्लागार अशा निर्बंधांच्या अधीन असतात. गुंतवणूकदार समाजमाध्यमावर मिळणाऱ्या ‘स्टॉक टिप्स’ आणि सुरत, इंदूरसारख्या शहरांतून फोनद्वारे काम करणारे अल्पावधीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवतात. हे घटक रिसर्च अ‍ॅनालिस्ट म्हणून सेबीकडे नोंद झालेले असले तरी त्यांना थेट ग्राहकांना ‘स्टॉक टिप्स’ विकण्याची मुभा नाही. अशा व्यक्ती किंवा कंपन्यांवर कारवाई  झालेली दिसत नाही. खरे तर अशा घटकांवर या आधीच ‘सेबी’ने आसूड ओढायला हवे होते.

‘सेबी’च्या या आदेशाने संशोधन विश्लेषक (रिसर्च अ‍ॅनालिस्ट) आणि नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (आरआयए) यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. ज्या व्यक्ती किंवा मंच मोठय़ा समूहांना सेवा देत आहेत त्यांनी ‘सेबी’कडून याबाबत संपूर्ण स्पष्टता मागितली पाहिजे. संशोधन विश्लेषक आणि  नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार यांच्या धर्माबाबत एक पुसटशी लक्ष्मण रेषा असून ही रेषा गुंतवणूक विश्लेषक आणि नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार यांची  भूमिका वेगळी करते.

आरआयए अधिनियमांनुसार नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदारांना त्यांच्या जोखिमांकानुसार गुंतवणूक साधने सुचवू शकतात. ही मुभा रिसर्च अ‍ॅनालिस्ट यांना नाही. रिसर्च अ‍ॅनालिस्ट यांच्या संशोधन अहवाल एखादे उत्पादनाबाबत (समभाग किंवा म्युच्युअल फंड)  अधिक समजावून घेण्यास आरआयए किंवा एमएफडी (वितरक) यांनी वापरावा आणि गुंतवणूकदाराच्या जोखिमांकानुसार त्या साधनाची शिफारस करावी, असा याचा अर्थ आहे. यानिमित्ताने सेबीने रिसर्च अ‍ॅनालिस्ट, आरआयए आणि एमएफडी यांच्या धर्माची व्याख्या अधोरेखित केली आहे. अनेक गुंतवणूकदार आपला जोखिमांक समजावून न घेता समाजमाध्यमावर मिळणाऱ्या ‘स्टॉक टिप्स’ आणि सुरत, इंदूरसारख्या शहरांतून फोनद्वारे मिळालेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करतात. अशा सल्ल्यानुसार गुंतवणूक करणे वैध नाही, हेसुद्धा समजावून घेणे आवश्यक आहे.

shreeyachebaba@gmail. com

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.