अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्साई नेरोलॅक ही बहुराष्ट्रीय जपानी कन्साई समूहाची उपकंपनी आहे. जागतिक बाजारपेठेत कन्साई सजावटीच्या आणि औद्योगिक रंग उत्पादनांतील एक आघाडीची कंपनी समजली जाते. भारतीय उपकंपनी कन्साई नेरोलॅक ही मुख्यत्वे औद्योगिक पेंट, ऑटोमोटिव्ह, पावडर आणि सामान्य औद्योगिक कोटिंग्ज उत्पादनांत आहे. नामांकित जागतिक उत्पादकांची उपकंपनी तसेच कन्साईचे तांत्रिक सहकार्य यामुळे कन्साई नेरोलॅकला स्पर्धात्मक फायदा मिळतो. तसेच कंपनीची उत्पादने आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आणि वैशिष्टय़ांची पूर्तता करणारी  मानली जातात. अत्याधुनिक आर्किटेक्चरल कोटिंग्जच्या निर्मितीसाठी कन्साईसोबतच्या मुख्य तांत्रिक सहकार्याव्यतिरिक्त, समूहाचे ओशिमा कोग्यो कंपनी लिमिटेड, जपान (उष्णता-प्रतिरोधक पेंटसाठी), प्रोटेक ऑक्सिप्लास्ट ग्रुप, कॅनडा (पावडर कोटिंग्जसाठी) आणि कॅश्यू लिमिटेड जपान (ऑटोमोटिव्ह कोटिंग्जसाठी) यांच्याशी तांत्रिक संबंध आहेत. २०२० या आर्थिक वर्षांत कंपनीने पॉलिजेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने नेरोफ्लिक्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. नेरोफिक्स अधेसिव्ह, सीलंट, बांधकाम रसायने, मिश्रण, वॉटरप्रूिफग संयुगे, पोत आणि पेंट इ. उत्पादनांत आहे. विस्तारीकरणासाठी कंपनीने त्याच आर्थिक वर्षांत पर्मा कन्स्ट्रक्शन एड्स प्रायव्हेट लिमिटेड ही बांधकाम रसायनांमधील कंपनीदेखील विकत घेतली. या सगळय़ांमुळेच कन्साई नेरोलॅक ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कोटिंग कंपनी आहे आणि इंडस्ट्रिअल कोटिंगमध्ये मार्केट लीडर आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kansai nerolac paints limited company profile zws
First published on: 11-04-2022 at 01:01 IST