|| प्रवीण देशपांडे

भांडवली बाजारात सूचिबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या समभाग-विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावर आणि त्याच्या करआकारणीवर बऱ्याच गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहेत. समभाग ३१ जानेवारी २०१८ पूर्वी खरेदी केले असतील किंवा बक्षीस समभाग म्हणजेच ‘बोनस’ शेअर मिळाला असेल. किंवा ३१ जानेवारी २०१८ नंतर खरेदी केले असतील अगर बोनस मिळाला असेल तर भांडवली नफा गणण्याच्या तरतुदी वेगवेगळय़ा आहेत.     

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
Why Arvind Kejriwal allowed to keep toffees with him in Tihar jail
डायबिटीस असलेल्या अरविंद केजरीवालांना जेलमध्ये का देणार चॉकलेट-गोळ्या? मधुमेहींना कसा होतो गोडाचा फायदा?
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

प्रश्न : मी माझ्या होणाऱ्या पत्नीला ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त १ लाख रुपये भेट म्हणून दिले आहेत. या रकमेवर मला किंवा माझ्या होणाऱ्या पत्नीला कर भरावा लागेल का? या भेटीच्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न माझ्या उत्पन्नात जोडले जाईल का?

– सुरेश मोरे, मालाड

उत्तर : लग्नापूर्वी होणाऱ्या पत्नीला दिलेली भेट ही करपात्र भेट म्हणून गणली जाते. एका आर्थिक वर्षांत एकूण ५०,००० रुपयांपर्यंत मिळालेली भेट करमुक्त असते. मात्र भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर भेटीची संपूर्ण रक्कम करपात्र असते. आपण होणाऱ्या पत्नीला दिलेल्या भेटीची संपूर्ण रक्कम, १ लाख रुपये, ही त्यांना करपात्र असेल. ही भेट देताना त्या तुमच्या पत्नी नसल्यामुळे या भेटीच्या गुंतवणुकीवर मिळालेले उत्पन्न आपल्या उत्पन्नात जोडले (क्लिबग) जाणार नाही आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा भेटीच्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न हे त्यांनाच करपात्र असेल. हीच भेट लग्नानंतर दिली असती तर पत्नीला भेटीवर म्हणजेच १ लाख रुपयांवर कर भरावा लागला नसता. परंतु या भेटीच्या गुंतवणुकीवर मिळालेले उत्पन्न आपल्या उत्पन्नात जोडले गेले असते.

प्रश्न : मी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या एका कंपनीचे ३०० समभाग मे २०१० मध्ये खरेदी केले होते. या समभागावर मला जून २०१२ मध्ये १०० बक्षीस समभाग मिळाले आणि मे २०१९ मध्ये २०० बक्षीस समभाग मिळाले. हे सर्व ६०० समभाग मी आता विकले तर यावर भांडवली नफा कसा गणावा आणि त्यावर किती कर भरावा लागेल?

– केशव जोशी, ठाणी

उत्तर : बक्षीस मिळालेल्या समभागासाठी गुंतवणूकदाराला कंपनीला पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्याचे खरेदी मूल्य शून्य असते. जे समभाग ३१ जानेवारी २०१८ पूर्वी खरेदी केले आहेत किंवा बक्षीस म्हणून मिळालेले आहेत असे एकूण ४०० समभाग आहेत. ३१ जानेवारी २०१८ नंतर धारण केलेले २०० समभाग आहेत. यानुसार खरेदी मूल्य गणून दीर्घमुदतीचा भांडवली नफा गणावा लागेल आणि मे २०१९ मध्ये मिळालेल्या बक्षीस समभागासाठी खरेदी मूल्य शून्य समजून भांडवली नफा गणावा लागेल. या एकूण दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कलम ११२ अ नुसार कर भरावा लागेल. १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार) कर भरावा लागेल.

प्रश्न :‘बोनस स्ट्रिपिंग’ म्हणजे काय याचा भांडवली नफ्यावर आणि करावर काय परिणाम होतो?

-स्वाती देशमुख, औरंगाबाद</strong>

उत्तर : ‘बोनस स्ट्रिपिंग’ हे कर वाचविण्यासाठी वापरले जाणारे हत्यार आहे. सध्याच्या तरतुदीनुसार यामध्ये म्युच्युअल फंडातील युनिट्सची खरेदी रेकॉर्ड तारखेच्या पूर्वी तीन महिन्यांत केली असेल आणि त्यावर बक्षीस युनिट्स रेकॉर्ड तारखेला मिळाले असतील आणि या रेकॉर्ड तारखेनंतर ९ महिन्यांत बक्षीस मिळालेले युनिट्स ठेवून. मूळ खरेदी केलेले काही किंवा सर्व युनिट्स विकले आणि त्यावर तोटा झाला असेल तर तो गणला जाणार नाही आणि त्याचा फायदा घेता येणार नाही. हा विचारात न घेतला जाणारा तोटा बक्षीस युनिट्सचे खरेदी मूल्य म्हणून समजले जाईल. बक्षीस जाहीर करण्यापूर्वी युनिट्सचे बाजार मूल्य कमी असते आणि बक्षीस मिळाल्यानंतर बाजार मूल्य कमी होते. अशा कमी झालेल्या मूल्यावर विक्री केल्यास तोटा होतो. हा तोटा इतर भांडवली तोटय़ातून वजा करून कर दायित्व कमी केले जाते. यावर आळा घालण्यासाठी कलम ९४ मध्ये म्युच्युअल फंडावरील युनिट्ससाठी ही तरतूद आहे. जेणेकरून अशा ‘बोनस स्ट्रिपिंग’द्वारे कराची टाळाटाळ रोखली जाते. अशी तरतूद सध्यातरी कंपन्यांच्या समभागाच्या बोनस स्ट्रिपिंगसाठी नाही. मात्र ही पळवाट रोखण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात ‘बोनस स्ट्रिपिंग’च्या तरतुदीमध्ये कंपन्यांच्या समभागाचासुद्धा समावेश करण्याचे सुचविण्यात आलेले आहे. त्यामुळे करदात्याला १ एप्रिल २०२२ नंतर अशा विक्रीवर होणारा तोटा वजा करता येणार नाही. उदा. एका कंपनीच्या समभागाचा बाजार भाव, बक्षीस जाहीर करण्यापूर्वी, ५०० रुपये आहे आणि गुंतवणूकदाराकडे १०० समभाग आहेत त्यावर १:१ बोनस दिल्यानंतर त्याच्याकडे २०० समभाग होतील आणि त्याचे बाजार मूल्य बक्षीस समभाग दिल्यानंतर प्रति समभाग २५० रुपये झाले आणि गुंतवणूकदाराने १०० समभाग २५० रुपयांस विकल्यास (जे ५०० रुपयांना खरेदी केले होते हे प्रथम खरेदी प्रथम विक्री या तत्त्वानुसार) त्यावर २५० रुपये असा एकूण २५,००० रुपयांचा तोटा दाखवून तो इतर भांडवली नफ्यातून वजा करून कर वाचविता येत होता. आता १ एप्रिल २०२२ नंतर असे करता येणार नाही.

प्रश्न : मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्याकडे दोन घरे आहेत. ही दोन्ही घरे मी २००१ पूर्वी खरेदी केलेली आहेत. एका घरात मी राहतो आणि दुसरे घर भाडय़ाने दिले आहे. हे दुसरे घर मी विकण्याचा निर्णय घेतला आहे. माझे वय बघता हा कर वाचविण्यासाठी मी कोणतीही गुंतवणूक करू इच्छित नाही. मला यावर किती कर भरावा लागेल?

– एक वाचक

उत्तर : आपण घर २००१ पूर्वी खरेदी केले असल्यामुळे आपल्याला भांडवली नफा गणण्यासाठी १ एप्रिल २००१ रोजीचे वाजवी बाजार मूल्य किंवा मुद्रांक शुल्कानुसार बाजार मूल्य यामधील जे कमी आहे ते खरेदी मूल्य विचारात घेऊन त्यावर आर्थिक वर्ष २००१-०२ चा महागाई निर्देशांक आणि यावर्षी घर विकल्यास २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा महागाई निर्देशांक विचारात घेऊन खरेदी मूल्य गणावे लागेल. विक्री किमतीमधून (विक्री खर्च वजा जाता) हे खरेदी मूल्य वजा केल्यानंतर भांडवली नफा काढता येईल. विक्री किमतीत आणि मुद्रांक शुल्कानुसार बाजार मूल्यामध्ये तफावत असेल तर भांडवली नफा गणताना यापैकी जी रक्कम अधिक असेल त्यानुसार भांडवली नफा गणावा लागेल. ही तफावत १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ती विचारात घेतली जाणार नाही. अशा प्रकारे गणलेल्या भांडवली नफ्यावर २० टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक अधिभार) कर भरावा लागेल. 

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com