आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

निफ्टी निर्देशांक १८,०९५ ते १६,८२४ अशा १,२७१ अंशांच्या घसरणीतून सावरला हे चांगल घडलंय. पण या सुधारणेत – तेजीत निफ्टी निर्देशांक १७,४५० लाच वारंवार का अडखळतोय? कुठे काही तरी बिघडलंय. तेजीमुळे घडलंय आणि मंदीमुळे बिघडलंय, अशा हिंदूोळय़ावर सरलेल्या सप्ताहाची वाटचाल होती. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १७,००० चा स्तर राखण्याची नितांत गरज आहे. असे घडल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १७,४५० ते १७,६५० असेल. निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी १७,००० ते १७,६५० या स्तराला ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असेल. निफ्टी निर्देशांक १७,६५० च्या स्तरावर दहा दिवस सातत्याने टिकल्यास शाश्वत तेजी गृहीत धरून निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्य १७,८००, १८,१०० अशी असतील. ही नाण्याची एक बाजू झाली.

निफ्टी निर्देशांक १७,४५० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरला आणि या निर्देशांकाने १७,००० चा स्तरदेखील तोडल्यास निफ्टी निर्देशांकाची खालची लक्ष्य ही १६,८००, १६,५००, १६,२०० अशी असतील. असे घडल्यास निफ्टी निर्देशांकावर तेजीची चाल बिघडलेली आहे असे गृहीत धरावे.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५७,१९७.१५

निफ्टी : १७,१७१.९५

बजाज ऑटो लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, २७ एप्रिल     

२२ एप्रिलचा बंद भाव – ३,६४४.५० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,५८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,५८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ३,५८० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,४५० रुपयांपर्यंत घसरण.

हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, २७ एप्रिल

२२ एप्रिलचा बंद भाव – २,१२९.७० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,१३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २,१३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,२०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,३८० रुपये.

ब) निराशादायक निकाल: २,१३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,९५० रुपयांपर्यंत घसरण.

आयईएक्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, २७ एप्रिल     

२२ एप्रिलचा बंद भाव – २३०.३० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २२३ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २२३ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २५० रुपये, द्वितीय लक्ष्य २७५ रुपये.

ब) निराशादायक निकाल: २२३ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २०० रुपयांपर्यंत घसरण.

निकालपूर्व विश्लेषण

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : शुक्रवार, २९ एप्रिल

२२ एप्रिलचा बंद भाव – ७,९०३.२५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,१५० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ७,८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७,५०० रुपयांपर्यंत घसरण.

अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार, २८ एप्रिल

२२ एप्रिलचा बंद भाव – ७८०.३५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ७६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८२० रुपये, द्वितीय लक्ष्य ९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ७६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७३० रुपयांपर्यंत घसरण.

बजाज फिनसव्‍‌र्ह लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार, २८ एप्रिल     

२२ एप्रिलचा बंद भाव – १५,४५०.०५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर -१६,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १६,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १६,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य १६,८०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: निराशादायक निकाल : १६,००० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १४,३०० रुपयांपर्यंत घसरण.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक