आशीष ठाकूर निफ्टीचे १७,००० ते १७,४५० दरम्यानच्या झुल्यावर उंच उंच झोके घेणे चालले आहे. त्यातून १७,४५० पर्यंत झेपावणारी जी काही क्षणिक तेजी दिसे त्याने गुंतवणूकदार सुखावले जात. तर परतीचा झोका पुन्हा १७,००० वर आल्यावर जाणवणारी मंदी सर्वानाच भिववत होती. त्या वेळेला परिस्थिती एवढी बिकट असायची की, निफ्टी निर्देशांक १७,००० चा स्तर आता राखेल का? हा स्तर राखण्यासाठी ‘आता सावर रे’ असे आपसूकच तोंडातून निघत असे. सरलेल्या सप्ताहातदेखील निफ्टीचा १७,४५० चा उंच झोका सर्वाना सुखावत होता, तर परतीचा १७,००० चा झोका सर्व गुंतवणूकदारांना भीती घालत होता. मानवी स्वभावातील आनंद, भीती या दोन्ही परस्परविरोधी भावनांचे बेमालूम मिश्रण सरलेल्या सप्ताहात आपण अनुभवले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५७,०६०.८७
निफ्टी : १७,१०२.५५
येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १७,००० चा स्तर राखण्याची नितांत गरजेचे आहे. असे घडल्यास प्रथम १७,४५० व त्यानंतर १७,६५० चा उंच झोका असेल, अन्यथा निफ्टी निर्देशांक १७,००० च्या स्तराखाली सातत्याने राहिल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १६,८००-१६,५००-१६,२०० असे असेल.
निकालपूर्व विश्लेषण
हिरो मोटोकॉर्प लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ३ मे
२९ एप्रिलचा बंद भाव – २,५०५.२५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,४०० रु.

  • उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,६३० रुपये, द्वितीय लक्ष्य २,८५० रुपये.
  • निराशादायक निकाल : २,४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,२५० रुपयांपर्यंत घसरण.
    टाटा स्टील लिमिटेड
    तिमाही वित्तीय निकाल -मंगळवार, ३ मे
    २९ एप्रिलचा बंद भाव – १,२७१.७० रु.
    निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,२७० रु.
  • उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,२७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३७० रुपये, द्वितीय लक्ष्य १,५०० रुपये.
  • निराशादायक निकाल : १,२७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,१६० रुपयांपर्यंत घसरण.
    कोटक मिहद्र बँक
    तिमाही वित्तीय निकाल -बुधवार, ४ मे
    २९ एप्रिलचा बंद भाव – १,७८८.९५ रु.
    निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,७६० रु.
  • उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,७६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९५० रुपये.
  • निराशादायक निकाल : १,७६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,६७० रुपयांपर्यंत घसरण
    टाटा पॉवर कंपनी लिमिटेड
    तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, ६ मे
    २९ एप्रिलचा बंद भाव – २४२.३० रु.
    निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २४० रु.
  • उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २७० रुपये, द्वितीय लक्ष्य ३०० रुपये.
  • निराशादायक निकाल : २४० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २०० रुपयांपर्यंत घसरण
    टायटन कंपनी लिमिटेड
    तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ३ मे
    २९ एप्रिलचा बंद भाव – २,४५९.२० रु.
    निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,५०० रु.
  • उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,६०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,७०० रुपये.
  • निराशादायक निकाल : २,५०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,३०० रुपयांपर्यंत घसरण.
    बॉम्बे डाइंग अँड मॅन्युफॅक्चिरग कं. लि.
    तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ४ मे
    २९ एप्रिलचा बंद भाव – १२३.९५ रु.
    निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १२५ रु.
  • उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १५५ रुपये, द्वितीय लक्ष्य १८० रुपये.
  • निराशादायक निकाल : १२५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १०० रुपयांपर्यंत घसरण.
    टाटा कन्झ्युमर प्राँडक्ट्स लिमिटेड
    तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ४ मे
    २९ एप्रिलचा बंद भाव – ८२४.२० रु.
    निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८०० रु.
  • उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८८० रुपये, द्वितीय लक्ष्य ९५० रुपये.
  • निराशादायक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७५० रुपयांपर्यंत घसरण.
    अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
    लेखक भांडवली बाजार विश्लेषक
    ashishthakur1966@gmail.com