अजय वाळिंबे
ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी म्हणजे ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज लिमिटेडचा पूर्वीचा एक स्वतंत्र विभाग होता. २०१८ मध्ये ग्रीनप्लाय कंपनीचे विलीनीकरण ग्रीनपॅनेल इंडस्ट्रीज या स्वतंत्र कंपनीत करण्यात आले. कंपनी मुख्यत्वे मध्यम प्लायवूड आणि मध्यम घनता फायबर बोर्ड म्हणजेच एमडीएफचे उत्पादन, वितरण आणि विपणन करते. ग्रीनप्लायच्या प्रत्येक भागधारकाला डिमर्जरवर १:१ प्रमाणात ग्रीनपॅनेलचे समभाग मिळाले होते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये एमडीएफव्यतिरिक्त डेकोरेटिव्ह लाकडी मजले, प्लायवूड, लिबास, फ्लोरिंग आणि दरवाजे यांचा समावेश होतो.
कंपनीच्या महसुलात बोर्ड आणि संबंधित उत्पादने ८७ टक्के तर प्लायवूड विभागाचा १३ टक्के महसूल आहे. ग्रीनप्लाय भारतातील एमडीएफ बोर्डाची सर्वात मोठी उत्पादक असून आशियातील तिसरी सर्वात मोठी आणि जगातील पाचवी मोठी उत्पादक कंपनी आहे. एमडीएफ कंपनीचा देशांतर्गत बाजार हिस्सा २९ टक्के आहे. कंपनीचा एमडीएफ व्यवसाय २०१० पासून चालू असून ग्रीनप्लाय भारतातील सर्वात जुनी आणि अनुभवी एमडीएफ उत्पादक आहे. कंपनी संपूर्ण देशभरात २,५३५ वितरक आणि १२,५०० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांसह कार्यरत आहे. कंपनीच्या भारतातील १७ शाखांद्वारे उत्पादन सेवा दिली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या, उत्तराखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये वार्षिक ५,८८,००० क्युबिक मीटर्स क्षमतेसह तीन अद्ययावत उत्पादन सुविधा आहेत. कंपनीची प्लायवूड उत्पादनाची वार्षिक क्षमता ११ दशलक्ष चौ. मीटर आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा एमडीएफ आणि प्लायवूड या दोन्ही विभागांसाठी क्षमता वापर अनुक्रमे ८१ टक्के आणि ९० टक्के होता. यंदाच्या आर्थिक वर्षांत एमडीएफ विभागाची क्षमता ६,६०,००० क्युबिक मीटर्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mdf markets greenpanel industries limited company amy
First published on: 12-09-2022 at 00:05 IST