आजचे नियोजन कोणा कुटुंबियांना मिळालेल्या विम्याच्या पशाचे नियोजन सुचविणारे आहे. कोणाला मिळालेल्या विम्याच्या पशाचे नियोजन करणे हे नक्कीच आनंददायक नाही. असे असले तरी कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास केवळ मोठय़ा रकमेचा मुदतीचा विमाच कुटुंबियांना संरक्षण देतो हे देखील यातून अधोरेखित होते. कुटुंबातला माणूस अकाली गेल्यास झालेले नुकसान भरून येत नाही. परंतु टर्मप्लान अर्थात मुदतीचा विमा असल्यास त्याची गृहकर्ज किंवा अन्य देणी व त्याला करावयाच्या आíथक तरतुदींची भरपाई नक्कीच होते. सुषमा भागवत (५२), पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात त्या रहातात. दहा वर्षांपूर्वी त्यांनी व त्यांच्या पतीने हे घर खरेदी केले. चार वर्षांपूर्वी अपघातात त्यांच्या सहजीवनावर आघात झाला. अचानक झालेल्या आघाताने सारे कुटुंबच हादरले. आई-वडिल, बहिणींनी व सुहृदांनी दिलेल्या सहकार्यामुळे त्या दु:खातून सावरल्या. सुषमा या एका राष्ट्रीयीकृत बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. त्यांना सुजय (२१) व सुखदा (१४) ही दोन अपत्ये आहेत. सुजय अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला असून सुखदा पुढील वर्षी शालान्त परीक्षेला बसेल. पुढील वर्षी अभियांत्रिकीची पदवी मिळताच सुजयचा पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा मानस आहे. सुषमा यांच्या पतीने अपघाती निधनाच्या दोन वर्षे आधी एक कोटीचा विमा खरेदी केला होता.  मिळालेल्या या विम्याच्या रकमेतून सर्व गृह कर्ज फेडून उरलेल्या पशातून त्यांनी मुदत ठेवी केल्या होत्या. जेव्हा रक्कम हातात आली तेव्हा त्यांना काही सुचत नव्हते म्हणून त्यांच्या बँकेतच त्यांनी मुदत ठेवी केल्या. तीन ते पाच वष्रे मुदतीसाठी केलेल्या ठेवी आता परिपक्व होत असून ऑक्टोबर २०१६ पर्यंत सर्वच ठेवींची मुदतपूर्ती होईल. या पशाची गुंतवणूक कशी करावी यासाठी त्यांनी ‘लोकसत्त्ता अर्थवृत्तान्त’ला मार्गदर्शन करण्याची विनंती केली.सुषमा भागवत यांच्याकडे पारंपारिक प्रकारच्या दोन जीवन विम्याच्या योजना असून तीन मनी बॅक व एक आजीवन (होल लाईफ) प्रकारची योजना आहे. या सर्व योजनांचे मिळून नसíगक मृत्यू झाल्यास १५ लाखाचे व अपघाती मृत्यू झाल्यास २० लाखाचे विमा छत्र आहे. त्यांची पुण्यात चंदननगर भागात गुंतवणूक म्हणून घेतलेली एक सदनिका असून या सदनिकेसाठी घेतलेल्या गृहकर्जाचा मासिक १४ हजाराचा हप्ता वेतनातून कापला जातो. हा हप्ता अजून सहा वष्रे त्यांना भरावा लागणार आहे. सुजयचे परदेशातील शिक्षण सुषमा यांच्या वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत पुरे होईल अशी आशा असून त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा त्यांचा विचार आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या काही शंकांचे निरसन केले.आजच्या बाजारभावानुसार सुषमा यांच्या दोन्ही स्थावर मालमत्तांची किंमत अंदाजे दोन कोटी असून पंचेचाळीस लाखांच्या मुदत ठेवी आहेत. अकरा लाखांचे गृहकर्ज अद्याप फेडायचे शिल्लक आहे. सुजयच्या परदेशी शिक्षणाला अंदाजे पस्तीस लाख व सुखदा हिच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी अंदाजे पंचवीस लाख खर्च अपेक्षित आहे. सुषमा यांना बँकेकडून निवृत्तीवेतन मिळणार असून एका अंदाज नुसार सेवानिवृत्तीवेळी (५८ वर्षांपर्यंत नोकरी केल्यास) ४० लाख निवृत्ती लाभ मिळेल. पुढील दहा वर्षांत सुषमा यांना विम्याच्या मुदत पूर्तीनंतर बारा लाख मिळणार आहेत.
आयुर्विमा
सुषमा यांचे आजचे वय आयुर्वमिा घेण्याचे नव्हे. सुषमा यांनी खरेदी केलेल्यापकी शेवटच्या योजनेची पूर्ती त्यांच्या वयाच्या ६१व्या वर्षी होणार आहे. सुषमा यांच्या सर्व वित्तीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सध्या उपलब्ध बचत व मालमत्ता पुरेशी आहे. सुषमा मुदतीच्या विम्याचे महत्व जाणतात. पतीचा मुदतीचा विमा नसता तर सध्याच्या घराचे गृहकर्ज फेडणे त्यांना एकटय़ाला शक्य झाले नसते. कदाचित लहान घरात राहावयास जावे लागले असते. त्यांच्या मुदतीच्या विम्याची मोठी रक्कम हाती पडल्याने सर्व गृह कर्ज फेडणे शक्य झाले. महागाईचा दर व भविष्यातील परकीय चलनातील खर्च लक्षात घेता भविष्यातील शिक्षणाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्या निवृत्तीपर्यंत त्यांनी नोकरी केली तर सर्व खर्च निभावतील. दुर्दैवाने त्यांचे आधी काही कमी-अधिक झाले तर मुलांना काही त्यांच्या भविष्यातील योजना रहित कराव्या लागतील. हे लक्षात घेऊन त्यांनी दहा वष्रे मुदतीचा पंचवीस लाखांचे संरक्षण देणारा विमा खरेदी करणे योग्य ठरेल, असा सल्ला त्यांना दिला. या विम्यासाठी वार्षकि रु. ११,३५७ (सेवा कराव्यतिरिक्त) हप्ता भरावा लागेल. व ५० लाखाचे विमा छत्र घेणे पसंत केले तर  वार्षकि रु. २०,७६५ हप्ता भरावा लागेल. सुषमा यांनी ५० लाखाचे विमा छत्राच्या पर्यायास पसंती दिली. सुजय परदेशी शिकायला जाण्यापूर्वी त्याचा पाच वर्षांचा व घेतलेल्या कर्जाइतक्या रकमेचा (अंदाजे ३० लाख) विमा आवर्जून घ्यावा यासाठी आजच्या उपलब्ध माहितीनुसार वार्षकि रु. ४,८९७ (सेवा करव्यतिरिक्त) हप्ता भरावा लागेल. खरेदी वेळी या हप्त्यात थोडी वाढ होणे शक्य आहे.
आरोग्यविमा
सुषमा भागवत यांना बँकेच्या समूह आरोग्यविमा योजनेत संरक्षण लाभले आहे. हे संरक्षण निवृत्तीनंतरही सुरू राहणार आहे. या कारणाने आरोग्यविम्याचा या नियोजनात विचार करण्यात आलेला नाही. सुजय जेव्हा परदेशात शिकायला जाईल तेव्हा योग्य त्यावेळी उपलब्ध असलेल्या उत्पादनातून योग्य कंपनीची आरोग्यविमा पॉलिसी त्याने घ्यावी.
गुंतवणूक
सुषमा भागवत यांनी आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. अतिरिक्त स्थावर मालमत्ता विकून टाकणे योग्य ठरेल. पाच वर्षांच्या काळात या मालमत्तेत झालेली वाढ पाहिली तर या मालमत्तेच्या परताव्याचा दर १० टक्क्य़ांदरम्यान आहे. भविष्यात ही मालमत्ता याहून चांगला परतावा देणार नाही. उलट परताव्याचा दर कमीच होत जाईल. सुषमा या बँकेच्या कर्मचारी असल्याने बाजारातून मिळणाऱ्या व्याजाच्या दरापेक्षा अल्पदराने घेतलेले कर्ज असले तरी अतिरिक्त मालमत्ता विकणे व कर्ज फेडून उरणारी रक्कम (अंदाजे १२ लाख) म्युच्युअल फंडात गुंतुवावी. दोन वर्षांनंतर सुषमा यांचा सुजयच्या परदेशातील शिक्षणासाठी कर्ज घेण्याचा विचार आहे. हे कर्ज घेणे गरजेचे आहे. एकाच वेळी दोन कर्जाची परतफेड सुरू असणे हे आदर्श नियोजन नव्हे.नियोजकाचा सल्ला मानून त्यांनी मार्च २०१६ आधी अतिरिक्त स्थावर मालमत्ता विकली तर पुढील आíथक वर्षांत त्यांना गृहकर्जावरील व्याज व मुद्दलाची परतफेड यासाठी मिळणारी करवजावट मिळणार नाही व अन्य करवजावट पात्र गुंतवणूक ११०,००० असेल. त्यांनी वार्षकि ३६,००० ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंडां’च्या यादीतून करवाजवट पात्र (ईएलएसएस) योजनेत गुंतवावे. अतिरिक्त ५० हजार राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन (एनपीएस) खात्यात भरले. तर अंदाजे १२ हजार कर वाचू शकेल. त्यांनी एनपीएससाठी ५० टक्के समभाग गुंतवणूक असलेला विकल्प स्वीकारावा. या गुंतवणुकीतून करवजावटी व्यतिरिक्त अंदाजे १२ टक्क्यांचा परतावा मिळेल.त्यांच्या ठेवींच्या मुदतपूर्तीनंतर एका पीएमएस सेवा देणाऱ्या म्युच्युअल फंडात किंवा गुंतवणूक उद्दिष्टांशी मिळतीजुळती उद्दिष्टे असणाऱ्या म्युच्युअल फंडात रक्कम गुंतवावी. फंडांची निवड केल्यास, ६० टक्के रक्कम लार्ज कॅप प्रकारच्या फंडात ३० टक्के मिड कॅप प्रकारच्या फंडात व आणीबाणीच्या स्थितीत खर्चासाठी उपलब्ध व्हावीत म्हणून १० टक्के रक्कम शॉर्ट टर्म फंडात गुंतवावी. सध्याच्या नकारात्मक बाजार स्थितीत समभागांमध्ये गुंतवणूक करावी का असा त्यांना प्रश्न पडला. सुषमा बँकेत नोकरीला लागल्या तेव्हा त्यांनी केलेली पहिली मुदत ठेव १५ टक्के व्याज देणारी होती. आज तीन वर्षांसाठी ८ टक्के दर मिळतो, असे त्यांनीच कबुल केले. सध्याची परिस्थिती जरी दोलायमान असली तरी तीन ते पाच वर्षांचा विचार केल्यास १५ टक्के परताव्याचा दर समभाग गुंतवणुकीतूनच मिळेल हे वास्तव आहे. म्हणून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय धाडसी न समजता परिस्थितीनुसार घेतलेला योग्य निर्णय म्हणावा लागेल.या सदरातून मुदतीच्या विम्याचा जागर असतो म्हणून टीका करणाऱ्या अनेक ई-मेल येत असतात. पारंपारिक विमा योजना विकण्यात रस असणाऱ्या मंडळींकडून या मेल आलेल्या असतात. ‘टर्म प्लान म्हणजे पशाची नासाडी’ असा समज ही मंडळीं विमाइच्छुकांना करून देतात. दुर्दैवाने अशा विक्रेत्यांना टर्म प्लान म्हणजे काय हे मुळातून शिकविण्याची गरज आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या नियोजनात बदल करायचे असतात. कालाय तस्म नम: हाच आजचा अर्थ बोध.

shreeyachebaba@gmail.com