आशीष ठाकूर

‘कवीच्या डोक्यात असते ते काव्य, कागदावर उतरते ती कलाकुसर’ हे विधान चतुरस्र कवयित्री शांताताई शेळके यांचे आहे. कवीच्या हृदयातील हृदयस्पर्शी भावना ज्ञानाच्या शीतल चांदण्यात न्हाऊन जे जन्माला येते ते महान काव्य व हे काव्य कवीच्या डोक्यात, मनात घोळत असते. हेच काव्य कागदावर उतरून संगीतकाराकडे दिले की, ते शब्द चालीच्या ‘मीटर’मध्ये बसवणे म्हणजे त्या काव्यावरील कलाकुसर.

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
India, Manufacturing Sector, Surges, 16 Year High, in March, HSBC PMI, production sector, finance, finance knowledge, financial decision,
निर्मिती क्षेत्राचा १६ वर्षांचा उच्चांकी जोम; मार्चचा ‘पीएमआय’ निर्देशांक विक्रमी ५९.१ गुणांवर

याच उक्तीप्रमाणे निफ्टी निर्देशांक १८,६०० वरून १७,६०० येईल हे रौद्र, दाहक काव्य होते, तर निफ्टी निर्देशांकाची पुढील वाटचाल काय असेल याचा घेतलेला अदमास ही कलाकुसर झाली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या. 

गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ६०,०६७.६२

निफ्टी : १७,९१६.८०

निफ्टी निर्देशांकाने १७,६१३ चा आधार घेत मंदीचे हजार अंशांचे चक्र पूर्ण केले. येणाऱ्या दिवसातील निफ्टी निर्देशांकाच्या तेजीच्या वाटचालीत १८,१०० हा अडथळा असेल हा स्तर निफ्टी निर्देशांकाने पार केल्यास, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य १८,४०० आणि द्वितीय लक्ष्य १८,६०० असेल.

निफ्टी निर्देशांक १८,१०० चा अवघड अडथळा पार करण्यास अपयशी ठरत, निफ्टी निर्देशांकाने १८,००० चा स्तरही तोडल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य १७,७०० आणि द्वितीय लक्ष्य १७,४५० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र लिमिटेड  

* तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ९ नोव्हेंबर

* ३ नोव्हेंबरचा बंद भाव- ८४८.६० रु. 

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ८१५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८१५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८८० रुपये, द्वितीय लक्ष्य ९३० रु.

ब) निराशादायक निकाल : ८१५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७६० रुपयांपर्यंत घसरण.

२) बँक आँफ बडोदा   

* तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १० नोव्हेंबर        

* ३ नोव्हेंबरचा बंद भाव – १००.९० रु.  

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ११० रुपये, द्वितीय लक्ष्य ११७ रुपये.

ब) निराशादायक निकाल : १०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८५ रुपयांपर्यंत घसरण.

३) सीईएससी लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, ११ नोव्हेंबर          

* ३ नोव्हेंबरचा बंद भाव – ८८.७५ रु.  

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ८५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १०२ रुपये, द्वितीय लक्ष्य १२० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ८५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७३ रुपयांपर्यंत घसरण.

४) टाटा स्टील लिमिटेड  

* तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, ११ नोव्हेंबर 

* ३ नोव्हेंबरचा बंद भाव – १,३२४.७० रु. 

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,३०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,३०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,२०० रुपयांपर्यंत घसरण.

५) अशोक लेलँड लिमिटेड  

* तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार, १२ नोव्हेंबर        

* ३ नोव्हेंबरचा बंद भाव – १४३ रु.  

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १३५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १३५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १५० रुपये, द्वितीय लक्ष्य १६५ रुपये.

ब) निराशादायक निकाल: १३५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १२५ रुपयांपर्यंत घसरण.

६) हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार, १२ नोव्हेंबर        

* ३ नोव्हेंबरचा बंद भाव- ४७९ रु.  

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ५२५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४२५ रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.