• मेष:-
    गैरसमज दूर सारावेत. फार विचार करत राहू नये. कलेला योग्य वेळ द्यावा. गुरुकृपेचा लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्यावी.
  • वृषभ:-
    जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही लाभ अचानक दिसतील. योग्य संधीची वाट पाहावी. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नवीन मित्र जोडले जातील.
  • मिथुन:-
    कामाच्या पद्धतीत वारंवार बदल करू नयेत. चिकाटी सोडू नका. तुमचे संपर्क वाढतील. चारचौघात उठबस करावी लागेल. संपर्कातील लोकांकडून कौतुक केले जाईल.
  • कर्क:-
    जोडीदाराचा चांगला सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. प्रकृतीच्या तक्रार दूर होईल. मानसिक शांततेला महत्व द्यावे. कामातून चांगली प्राप्ती संभवते.
  • सिंह:-
    मुलांच्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तुमच्या कडील माहितीचा सदुपयोग करता येईल. पत्नीची बाजू जाणून घ्यावी. प्रवासात सतर्कता ठेवावी. अतिकाळजी करत राहू नका.
  • कन्या:-
    हातातील कामाकडे लक्ष द्यावे. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. कसलीही चालढकल करू नका. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्या. मनातील निराशा दूर सारावी.
  • तूळ:-
    कामातून मिळणार फायदा लक्षात घ्यावा. खर्चाचा पुनर्विचार करावा. तुमच्यातील धैर्य वाढेल. धाडसाने नवीन कामात हात घालावा. ताळमेळ साधण्यात यश येईल.
  • वृश्चिक:-
    आर्थिक गणित कोलमडू देऊ नका. काही गोष्टींचा पुनर्विचार करावा. कामातील उत्साह वाढले. आततायीपणाने निर्णय घेणे टाळावे. नातेवाईकांशी क्षुल्लक गोष्टींवरून मतभेद संभवतात.
  • धनु:-
    मानसिक चिंता दूर करण्याचा प्रयत्न करावा. थकवा जाणवेल. स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यावे. सामाजिक जाणिव ठेवाल. अडथळा बाजूला करता येईल.
  • मकर:-
    प्रत्येक गोष्टीत आनंद शोधावा. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचायला मिळेल. महिला आपली हौस पूर्ण करतील. सर्वांशी गोड बोलाल.
  • कुंभ:-
    सर्व गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे. मनातील विचित्र कल्पना बाजूला साराव्यात. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. आवडीने पदार्थांची चव चाखाल. घरगुती कामात दिवस जाईल.
  • मीन:-
    तुमच्या मनमिळाऊ व्यक्तिमत्वाची छाप पडेल. आनंदीवृत्तीने वागाल. मित्रांच्या ओळखीने कामे होतील. व्यावसायिक लाभ चांगला होईल. वाहन विषयक प्रश्न मार्गी लागतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर