• मेष:-
    उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. घरातील प्रेमळ वातावरणात रममाण व्हाल. जोडीदाराची तब्येत सांभाळावी.
  • वृषभ:-
    मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. मैदानी खेळ खेळाल. ज्ञानाचा उपयोग करून घ्याल. घरात धार्मिक कार्य होईल. हाताखालील लोकांकडून कामे होतील.
  • मिथुन:-
    कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. वाताचे त्रास संभवतात. प्रवासाने थकवा जाणवेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नयेत.
  • कर्क:-
    मनाची चंचलता जपावी लागेल. भावंडाना विरोध करू नका. काही गोष्टींपासून दूर राहावे. बौद्धिक चलाखी दाखवाल. वाहन चालविताना काळजी घ्यावी.
  • सिंह:-
    न डगमगता कामे हाती घ्याल. वादविवादात अडकू नका. लहरिपणे वागू नये. घरगुती जबाबदारी वाढेल. तिखट पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल.
  • कन्या:-
    कामाचा जोम वाढेल. ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल. उष्णतेचा त्रास जाणवेल. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. स्वतः च्या हिमतीवर काम हाती घ्यावे.
  • तूळ:-
    काही कामांना खीळ बसू शकते. चारचौघात उघडपणे बोलणे टाळावे. कौटुंबिक कार्यात हातभार लावावा. व्यावसायिक लाभाचा दिवस. आर्थिक प्रश्न सुटेल.
  • वृश्चिक:-
    मित्रांशी वाद वाढवू नका. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. सतत खटपट करून कामे उरकाल. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्नात कसूर करू नका.
  • धनू:-
    कामात काही बदल करावेत. वडीलधाऱ्यांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. उपासनेला अधिक बळ मिळेल. व्यावसायिक प्रगतीकडे लक्ष द्यावे. कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्यावी.
  • मकर:-
    प्रवासात वाहन चालविताना काळजी घ्यावी. स्वकष्टावर भर द्याल. धार्मिक कामात मदत करावी. वरिष्ठांना नाराज करू नये. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.
  • कुंभ:-
    गैरसमजाला मनात थारा देऊ नका. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नसत्या काळज्या करू नका. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
  • मीन:-
    भागदाराशी मतभेद वाढवू नका. अचानक लाभाने खुश व्हाल. जुन्या कामात दिवस जाईल. सासुरवाडीची मदत मिळेल. कमी श्रमात कामे होतील.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर