News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ०६ जानेवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  भावंडांचे प्रश्न समजून घ्यावेत. काही गोष्टी अचानक सामोऱ्या येतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. खर्चावर आवर घालावी. वादाचे मुद्दे सामोपचाराने सोडवावेत.
 • वृषभ:-
  जोडीदाराच्या प्रक्रृतीची काळजी घ्यावी. एकमेकांत मतभिन्नता राहील. जोडीदाराचा वरचष्मा राहील. संमय वाढवावा लागेल. महत्वकांक्षेत वाढ होईल.
 • मिथुन:-
  खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. पोटाच्या तक्रारी जाणवतील. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. तिखट व तामसी पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. उष्णतेचे त्रास वाढू शकतात.
 • कर्क:-
  मुलांशी जुळवून घ्यावे लागेल. कामातील विलंब टाळावा. पैज जिंकता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. जुगाराची आवड पूर्ण कराल.
 • सिंह:-
  संघर्षापासून दूर राहावे. घरातील शांतता जपावी. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी. कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे. दिवसभर कामात व्यग्र राहाल.
 • कन्या:-
  न डगमगता कामे कराल. भावंडांची बाजू समजून घ्यावी लागेल. परिस्थिती समजून घेऊन वागावे. स्वमतावर आग्रही राहाल. हातापायाच्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे.
 • तूळ:-
  स्वभावात लहरीपणा येईल. जरुरी नसतांना उदारपणे वागू नका. वस्तूची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. बोलतांना भान राखावे. उतावीळपणा करून चालणार नाही.
 • वृश्चिक:-
  रागाच्या भरात निर्णय घेतले जातील. संमय व धैर्य ठेवावे. कामात मेहनत घ्याल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. हातातील कामात यश येईल.
 • धनु:-
  स्वतः चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. वागण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सामाजिक कार्यात हातभार लावाल. योग्य तर्क वापरावा. न्यायी वृत्तीने वागणे ठेवाल.
 • मकर:-
  सतत खटपट करत राहाल. प्रलोभनांपासून दूर राहावे. सामाजिक सेवेत हातभार लावाल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावी.
 • कुंभ:-
  जिवाभावाचे मित्र भेटतील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. काटकसरीने वागाल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल. वाहन विषयक कामे होतील.
 • मीन:-
  व्यावसायिक चिंता मिटेल. हातातील अधिकारात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 6:09 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 06 january 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, ०५ जानेवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०४ जानेवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०३ जानेवारी २०२०
Just Now!
X