मेष : आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळविण्यासाठी कुटुंबियांना आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल व आपला हेतूसाध्य कराल. आर्थिक गुंतवणूकीसाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावपाडाल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल.

वृषभ : शुभसमारंभात सहभागी व्हावे लागेल. आज आपल्याला संतज्जनांचा सहवास लाभेल परदेशातील सहाकार्यांकडूनआपल्याला महत्वाची बातमी समजेल. नवीन कल्पना आकार घेतील. घरातील सुख़सुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखाल.

24th April Panchang Marathi Horoscop
२४ एप्रिल पंचांग: उत्तम आर्थिक लाभ ते कौटुंबिक सौख्य, आज १२ पैकी ‘या’ राशींचे नशीब उजळवणारा माता लक्ष्मी
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?

मिथुन : आपली महत्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत, गहाळ होण्याची शक्यता आहे. भावंडांशी मतभेद टाळावेत. व्यवसायाचेकार्यक्षेत्र वाढविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल.

कर्क : शैक्षणिक बाबींसदर्भात प्रगतीकारक घटना घडतील. पूर्वी दिलेल्या स्पर्धात्मक परीक्षेचे यश अथवा पुरस्काराबद्दलचीबातमी समजेल. नोकरी-व्यवसायात मिळालेल्या यशाबद्दल मित्र परिवाराला मेजवानी द्याल. दुसर्याच्या मनाचा विचार करुनच वक्तव्य करावे. अनावश्यक खर्च उद्भवण्याची शक्यता राहते.

सिंह : वास्तू खरेदी संबंधी आपण आज आपल्या कुटुंबाशी विचारविमर्श कराल. आज आपल्या घरी नातेवाईक येतील.व्यावसायिक मतभेद टाळावेत. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल.

कन्या : आज आपले अंदाज अचूक ठरतील. आपल्या भावंडासंबंधीच्या सुवार्ता आज आपल्या कानी येतील. आपण आज जरपरदेशप्रवास करणार असाल तर काही कारणांनी तो टाळावा लागेल. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.

तूळ : शिक्षणासाठी दूर राहिलेली आपली भावंडे आज घरी येतील. आज अचानक धनलाभाचा योग आहे. अनपेक्षित परिचित व्यक्तिकडून आर्थिक सहाय्य मिळेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.

वृश्चिक : आज वरिष्ठांना महत्वाच्या कामातील सल्ला विचारण्यापेक्षा काम पूर्ण करून त्यांच्यापुढे ठेवलेत तर आपल्या पाठीवरशाबासकीची थाप पडेल. आपले निर्णय आपणच घ्या व त्यावर अंमलबजावणी करा. अपूर्ण राहिलेल्या पूर्वीच्याकामांना गती द्या. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.

धनू : आज आपल्या हातून दानधर्म होतील. आपण ठरविलेली आजची कामे काही कारणामुळे आपल्याकडून अपूर्ण राहतील. आजचा दिवस आपल्याला प्रवासासाठी अनुकूल आहे. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल.

मकर : वाहने चालविताना सावधगिरी बाळगा. व्यावसायिक शुभारंभ होतील. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवसअनुकूल आहे. खोटय़ा गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. मात्र अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका.

कुंभ : आपल्या नोकरीतील उत्कर्षामुळे वरिष्ठांना आपल्या घरी मेजवानी द्यावी लागेल. घरासाठी मौल्यवान वस्तूंची आजआपण खरेदी कराल. संततीसंबंधी चिंता राहतील. आज आपल्याला एखाद्या व्यवहारात अनपेक्षितरित्या जादा नफा मिळेल. वरिष्ठांकडून एखादी सवलत मिळेल.

मीन : संततीच्या शैक्षणिक घडामोडीसंदर्भात काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी प्रवास करावा लागेल. आजआपल्या महत्वांच्या कामांसाठी आपल्या भावंडांची मदत घ्यावी लागेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर