04 June 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, १४ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  हाताखालील लोक तुमचे आदेश मानतील. व्यावसायिक बदलाचा विचार कराल. स्पर्धेत भाग घ्याल. काही कामात अधिक प्रयत्न करावेत. आरोग्याची काळजी घ्यावी.
 • वृषभ:-
  स्वच्छतेवर अधिक लक्ष द्याल. वाहन विषयक कामे निघतील. हातात पैसे येतील. घरगुती कामात किरकोळ अडचण येईल. कामाकडे बारीक लक्ष द्यावे.
 • मिथुन:-
  नोकरदारांची कामे वाढू शकतात. जवळचा प्रवास करावा लागेल. तुमचे काम तडीस जाईल. पैजेत यश येईल. आरोग्यात सुधारणा होईल.
 • कर्क:-
  अंगीभूत कलागुण प्रकट होतील. स्पर्धेत यश मिळेल. घरात पाहुण्यांची रेलचेल राहील. मित्रांच्या सहवासात दिवस मजेत जाईल. चित्रकलेचा आनंद घ्याल.
 • सिंह:-
  मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. चारचौघांत आपले वजन निर्माण कराल. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. वेळेची जाणीव ठेवाल. कर्तव्याचे भान राखाल.
 • कन्या:-
  तुमच्यातील वैशिष्ट इतरांच्या लक्षात येईल. मत योग्यरीतीने मांडण्याची संधी मिळेल. धीटपणे वागण्याकडे लक्ष द्यावे. आर्थिक लाभ चांगला होईल. मौजमजा करण्याकडे कल राहील.
 • तूळ:-
  वाढत्या खर्चावर लक्ष ठेवा. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. नातलग खर्चात पाडू शकतात. कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 • वृश्चिक:-
  कर्म केल्याशिवाय फळ मिळणार नाही. घरात समाधानाचे वातावरण असेल. इच्छित सुख लाभेल. कलेला प्रोत्साहन मिळेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
 • धनु:-
  नवीन वस्त्रे खरेदी कराल. हातून धार्मिक कार्य घडेल. महिलांना बाहेरील कामे अधिक करावी लागतील. मनातील इच्छा तत्काळ पूर्ण होईल. तुमच्या हातून चांगले काम होईल.
 • मकर:-
  तुमच्यातील वैशिष्ट्याला चांगला वाव मिळेल. घराची कामे पूर्ण होतील. चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल. कामाला चांगली प्रसिद्धी मिळेल. प्रगतीकडे लक्ष ठेवावे.
 • कुंभ:-
  अडचणींवर मात करता येईल. आरोग्याच्या काही तक्रारी राहतील. अडकलेले पैसे मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता. घराची दुरुस्ती निघेल.
 • मीन:-
  विशिष्ट कामात यश येईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तब्येतीत सुधारणा होईल. छुपे शत्रू त्रासदायक ठरू शकतात. जोडीदाराची काळजी घ्यावी.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 14 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवारी, १२ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ११ सप्टेंबर २०१९
Just Now!
X