मेष:- कर्मठपणे आपले मत दर्शवाल. वडीलधाऱ्यांचा आदर करावा. बुद्धीची प्रगल्भता दाखवावी. शासकीय कामे होतील. चुकीच्या गोष्टीचा विरोध कराल. वृषभ:- उगाचच खचून जाऊ नये. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वेळच्यावेळी औषधोपचार करावेत. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. चिकाटी धरून ठेवावी. मिथुन:- शांतपणे आपले मत नोंदवाल. नवीन पद्धतीचा वापर करावा. आधुनिक बाजू जाणून घ्यावी. जोडीदाराचे कौतुक कराल. घरगुती प्रश्न समर्थपणे सोडवाल. कर्क:- गैरसमजुतीत अडकू नका. कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करावा. संसर्गजन्य विकार संभवतात. हाताखालील लोकांकडे लक्ष ठेवा. कामात सातत्य ठेवावे लागेल. सिंह:- व्यावहारिकता जपाल. धोरणीपणे विचार कराल. कामात दीर्घ चिकाटी ठेवाल. तुमच्या बुद्धीचे कौतुक केले जाईल. अविश्वास दाखवू नका. कन्या:- वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे. काही कामात जरा अधिक कष्ट पडतील. विचार भरकटू देऊ नका. कामातील उत्साह वाढेल. अति कामामुळे थकवा जाणवेल. तूळ:- खोलवर विचार कराल. मनन, चिंतन करण्यावर भर द्याल. पराक्रमाला वाव आहे. स्वकर्तृत्वावर भर देऊन वागाल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वृश्चिक:- सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत फार विचार कराल. शक्यतो मोजकेच बोलाल. कंजूसपणा कराल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. धनु:- प्रौढपणे वागाल. निराश होण्याचे काही कारण नाही. प्रतिकुलतेतून मार्ग काढाल. काही बदलांकडे सकारात्मकतेने बघावे. सरकारी कामे करण्यात वेळ जाईल. मकर:- कामातील उशिराने वैतागून जाऊ नये. योग्य संधीची वाट पाहावी. प्रयत्नात कसूर करू नका. निराशेला मनातून बाजूला सारावे. आध्यात्मिक बळ वाढवावे. कुंभ:- गुंतवणुकीचा योग्य पर्याय शोधाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. व्यवहारिक विचार कराल. नवीन मित्र जोडावेत. एकाच बाजूने विचार करू नका. मीन:- अहंपणे विचार करू नयेत. चुकीच्या कल्पना बाजूला साराव्यात. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. परिस्थितीनुरूप वागाल. वडिलांशी जुळवून घ्यावं. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर