• मेष:-
    चित्त चांचल्य जाणवेल. घरापासून दूर राहावे लागेल. धार्मिक कामात हातभार लावाल. मनात अकारण चिंता सतावेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
  • वृषभ:-
    मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. मनात नवीन आकांक्षा रूजतील. वैवाहिक सौख्यात भर पडेल. व्यावसायिक लाभ अपेक्षेप्रमाणे संभवतो. मित्रमंडळ जमवाल.
  • मिथुन:-
    कामात वडिलांचे सहकार्य मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. चंचलता बाजूला सारावी. कौटुंबिक शांतता महत्वाची आहे. जोडीदाराचा विचार जाणून घ्यावा.
  • कर्क:-
    आशावादी दृष्टिकोन ठेवावा. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. मैत्रीचे संबंध सुधारतील. परोपकाराची जाणीव ठेवाल.
  • सिंह:-
    बोलतांना शब्द जपून वापरावेत. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. कामाच्या कक्षा रुंदावतील. उष्णतेचा त्रास जाणवेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
  • कन्या:-
    उगाच चिडचिड करू नये. कामात उगाच घाई करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. हस्त कलेला चांगला वाव मिळेल.
  • तूळ:-
    कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. कमिशनमधून फायदा संभवतो. सामाजिक वादात पडू नका. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे. इतरांच्या मनात आदर निर्माण कराल.
  • वृश्चिक:-
    जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. जवळचे नातेवाईक भेटतील. मनाजोगी खरेदी केली जाईल.
  • धनु:-
    स्त्री वर्गापासून सावध राहावे. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळावे. मोठया लोकांच्या ओळखी होतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जुनी देणी चुकती करावी लागतील.
  • मकर:-
    मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. उत्तम व्यवसाईक लाभ होईल. अंगिभूत कलेचे कौतुक केले जाईल. नवीन विचारांना चालना मिळेल. स्त्रीवर्गाची मदत होईल.
  • कुंभ:-
    एककल्ली विचार करू नयेत. उत्तम कौटुंबिक साथ मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नातेवाईकांचा गोतावळा जमेल. दिवस धावपळीत जाईल.
  • मीन:-
    व्यावसायिक प्रश्न सोडवावेत. गैरसमजाला मनातून काढून टाका. मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा. श्रद्धेने कामे हाती घ्याल. हातातील कामात यश येईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर