05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, रविवार, २७ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  भावंडांच्या मदतीला धावून जावे लागेल. अतिविचार करू नका. कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. निश्चित अनुमान काढावा. कामाच्या ठिकाणी डोके शांत ठेवावे.
 • वृषभ:-
  व्यवहार कुशलता दाखवाल. जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. तुमच्यातील सुशिक्षितपणा दिसून येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. व्यापारात चांगला फायदा होईल.
 • मिथुन:-
  इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मतभेदातून गैरसमज वाढवून घेऊ नका. बोलण्यात खरेपणा दर्शवावा. अविचाराला मनातून काढून टाकावा.
 • कर्क:-
  लेखनाला बळ मिळेल. बौद्धिक छंद जोपासाल. उपासनेकडे दुर्लक्ष करू नका. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचे कौतुक होईल. बौद्धिक चुणूक दाखवाल.
 • सिंह:-
  चार-चौघांत ठामपणे मत व्यक्त कराल. मानसिक तोल सांभाळावा. तामसी पदार्थ खाणे टाळावेत. अवाजवी खर्च आवरता घ्यावा. गप्पांमध्ये रमून जाल.
 • कन्या:-
  चौकसपणे गोष्टी समजून घ्याल. जवळच्या ठिकाणी धार्मिक यात्रा काढाल. चलाखीने कामे कराल. उत्साह ढळू देऊ नका. व्यावसायिक लाभाचा दिवस.
 • तूळ:-
  व्यावहारिक बुद्धिमत्ता वाढीस लावाल. आर्थिक मनाचे नवीन मार्ग शोधाल. कमिशनमध्ये चांगला फायदा होईल. लेखकांना स्फूर्ती मिळेल. वक्तृत्व गुण जोपासाल.
 • वृश्चिक:-
  हजर-जबाबीपणे उत्तर द्याल. धूर्तपणे फायदा साधून घ्याल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तत्परतेने कामे कराल.
 • धनु:-
  कागदपत्रांची व्यवस्थीत छाननी करावी. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. जामिनकीचे व्यवहार जपून करावेत. पारमार्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. प्रवासात काळजी घ्यावी.
 • मकर:-
  तरुण लोकांशी मैत्री कराल. लहानांशी खेळण्याचा आनंद घ्याल. मित्रांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल. गप्पागोष्टींत दिवस जाईल.
 • कुंभ:-
  तुमच्यातील कल्पकता दिसून येईल. मध्यस्थीचा लाभ उठवाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे. नवीन मित्र जोडावेत. एकटेपणा बाजूला ठेवावा.
 • मीन:-
  बौद्धिक कामांत यश येईल. वक्तृत्वातून छाप पडाल. शिस्तीचा बडगा करू नका. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi sunday 27 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X