मेष

ओम अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होईल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –आकाशी

वृषभ

ओम आदि गुरुवै नमः या मंत्राचा जप करावा. मोठे निणर्य सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – निळा

मिथुन

ओम राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –करडा

कर्क

दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यासायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –नारंगी

सिंह

श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबवता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग -जांभळा

कन्या

श्री दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –हिरवा

तुळ

दत्त मंदिरामध्ये निशिगंधाची फुले अर्पण करावी. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर माता करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग -ऑफ व्हाइट

वृश्चिक

दत्त मंदिरामध्ये पांढऱ्या पदार्थाचे अन्नदान करावे. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी
आजचा रंग –गुलाबी

धनु

श्री भानवै नमः या मंत्राचा जप करावा. महत्त्वकांशी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –लाल

मकर

ओम आंतद्रैयाय नमः या मंत्राचा जप करावा. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –निळा

कुंभ

हं राहवै नमः या मंत्राचा जप करावा. वादविवाद टाळावेत. व्यवसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग- ऑफ व्हाइट

मीन

दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आर्थिक iनयोजन उत्तम करऊ शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu