मेष:-मनाची द्विधावस्था राहील. संपूर्ण खात्री करूनच संमती द्या. नसती काळजी करत बसू नका. विरोधक मन बेचैन करतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ:-कामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. विनाकारण अडचणी सामोर्‍या येऊ शकतात.

मिथुन:-भावंडांशी मैत्रीचे नाते ठेवा. व्यवहार व नाते यात गफलत करू नका. दिनक्रम व्यस्त राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मनोबल वाढीस लागेल.

कर्क:-जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. भावनिक निर्णय घेऊ नका.

सिंह:-प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत काळ व्यतीत कराल. अपचनाचा त्रास संभवतो. मानसिक शांतता राखावी.

कन्या:-प्रखर मत नोंदवताना काळजी घ्या. गैरसमज होऊ देऊ नका. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. संयम व धैर्य राखावे. कामाची योग्य आखणी करावी.

तूळ:-लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा. कामाची दगदग राहील. थोडा स्वत:साठी वेळ काढावा. बोलण्यातून मान कमवाल. मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील.

वृश्चिक:-गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे. वडीलधार्‍यांचे सल्ले ऐकावेत. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. वाणी संयमित ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग.

धनू:-पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरासाठी काही खरेदी कराल. कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.

मकर:-कौटुंबिक कामाचा भार उचलावा. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस अनुकूल असेल. थोडीफार धावपळ संभवते. जागेच्या व्यवहारात गाफिल राहू नका.

कुंभ:-व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारी वर्गाला दिलासादायक दिवस. कौटुंबिक शांतता जपावी. क्षुल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका. वाहनाचे काम निघू शकते.

मीन:-व्यवसायिकांनी संधी ओळखावी. आजचा दिवस अनुकूल असेल. कामाची व्याप्ती वाढेल. मुलांचे प्रश्न मार्गी लावाल. प्रवास सत्कारणी लावाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर