सर्व राशीच्या लोकांचा स्वभाव भिन्न असतो, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन देखील भिन्न असतो. या वृत्तीचा त्यांच्या पैशांच्या व्यवस्थापनावरही परिणाम होतो. प्रत्येक राशीच्या लोकांवर वेगवेगळे ग्रहांचे स्वामित्व असते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे राहणीमानही वेगळे असते. जर आर्थिक दृष्टिकोनातून जगण्याचा प्रश्न असेल तर काही लोक खूप खर्च करणारे असतात तर काही खूप काटकसरी असतात.

काही माणसे अशीही असतात की, एक पैसाही खर्च करण्यापूर्वी ते त्याचे औचित्य समजून घेतात आणि जर त्यांना ते न्याय्य वाटले तर ते खर्चाची मर्यादा ओलांडायला मागेपुढे पाहत नाहीत. प्रत्येक राशीच्या लोकांच्या पैशाचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग जाणून घेऊया.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
  • मेष

ही राशी अग्नी तत्वाचे प्रतिनिधीत्व करते, त्यामुळे या राशीचे लोक शहाणपणाने पैसे खर्च करतात. असे लोक पैसे बचतीमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग होईल. कर्जात बुडणे त्यांना कधीच मान्य नाही.

  • वृषभ

पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या राशीच्या लोकांना वर्तमानात जगणे आवडते. पैशाच्या बाबतीत हे लोक फारसे सावध नसतात. त्यांना पैसे वाचवण्याची अजिबात चिंता नसते.

सर्वोत्कृष्ट मुलगा आणि जावई सिद्ध होतात ‘या’ राशीची मुलं; सर्वांचे मन जिंकण्यात असतात पटाईत

  • मिथुन

स्वभावाने तार्किक, या राशीच्या लोकांना पैसे खर्च करण्यात अजिबात संकोच वाटत नाही, परंतु अशावेळी त्यांच्या मनाची तयारी असायला हवी. तसे, त्यांना नियोजन करून पैसे खर्च करणे आवडते, म्हणजे, ते आधी किती खर्च करायचे याचे नियोजन करतात आणि मग त्यानुसार खर्च करतात.

  • कर्क

या राशीचे लोक दिखाव्यावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून ते विचार करून खर्च करण्याचा निर्णय घेतात. अशा व्यक्ती शाही खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

  • सिंह

सिंह राशीचे लोक, ज्यांना उदार मानले जाते, ते विलासीपणावर पैसा खर्च करू शकतात. त्यांना मोकळ्या हाताने पैसे खर्च करायला आवडतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मनी मॅनेजमेंट या शब्दाला फारसे स्थान मिळालेले नाही. त्यांना खर्चाची पर्वा नाही.

  • कन्या

या राशीचे लोक व्यावहारिक मानले जातात, म्हणून त्यांना व्यर्थ खर्च करणे आवडत नाही. त्यांना त्यांच्या पैशाचा चांगला वापर करण्याची इच्छा असते आणि गैरवापर झाल्यावर राग येतो.

मंदिरात घंटा वाजवण्याचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या याची वैज्ञानिक बाजू

  • तूळ

संतुलित बजेट बनवून खर्च करण्याची सवय तूळ राशीच्या लोकांमध्ये आहे, ते कमी किंवा जास्त खर्च करत नाहीत परंतु ते आवश्यकतेनुसार काम करतात. ते मोजून मापून खर्च करतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

  • वृश्चिक

या राशीचे लोक खर्च करणारे असले तरी कोणाला दिलेले पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर ते कठोर होतात. त्यांना सर्व कामे वेळेवर करायला आवडतात. तसेच आरामात आणि ऐषारामात पैसे खर्च करतात.

  • धनु

या राशीचे लोक पैशाची फारशी पर्वा करत नाहीत, त्यामुळे बचत करण्याची त्यांची प्रवृत्तीही कमी असते. जेव्हाही इच्छा होईल, ते अगदी खुल्या हाताने खर्च करतात.

  • मकर

या राशीच्या लोकांना राजेशाही खर्च करण्याकडे कल नसतो. कारण त्यांना वास्तवात राहायला आवडते, त्यामुळे त्यांचा पैसा नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्यात विश्वास असतो.

‘या’ राशीचे लोक व्यापारामध्ये असतात निपुण; धन-संपत्तीसोबतच मिळते अमाप यश

  • कुंभ

हे लोक विचारी योजनाकार असतात. जर या लोकांनी कर्ज घेतले असेल तर ते पैसे व्यवस्थापनाला सर्वोच्च स्थान देतात. कर्ज फेडणे ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे.

  • मीन

या राशीचे बहुतेक लोक आदर्शवादी आहेत, म्हणून ते पैसे वाचवण्याच्या योजनेवर खोलवर काम करत नाहीत. असे असूनही त्यांचे मनी मॅनेजमेंट सकारात्मक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)