scorecardresearch

Janmashtami and Sun Transit 2022: कृष्ण जन्माष्टमीपूर्वी ‘या’ ४ राशींना मिळेल अमाप पैसा; सुर्यदेवाची असेल विशेष कृपा

Janmashtami and Sun Transit 2022: श्री कृष्ण जन्माष्टमी ४ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मुहूर्त घेऊन येत आहे. १७ ऑगस्ट २०२२ रोजी जन्माष्टमीच्या एक दिवस आधी सूर्य सिंह राशीत प्रवेश करत आहे.

Janmashtami and Sun Transit 2022: कृष्ण जन्माष्टमीपूर्वी ‘या’ ४ राशींना मिळेल अमाप पैसा; सुर्यदेवाची असेल विशेष कृपा
कृष्ण जन्माष्टमीपूर्वी 'या' ४ राशींना मिळेल अमाप पैसा(फोटो: संग्रहित फोटो)

Janmashtami and Sun Transit 2022: चार राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा उत्तरार्ध खूप शुभ राहील. भगवान श्रीकृष्ण आणि सूर्य देव या राशींच्या लोकांवर विशेष कृपा करतील. १८ ऑगस्ट २०२२ रोजी भाद्रपद महिन्यातील अष्टमीला श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल आणि त्याच्या एक दिवस आधी १७ ऑगस्ट २०२२ रोजी सूर्यदेव राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करतील. सध्या सूर्य कर्क राशीत विराजमान आहेत. सिंह राशीत सूर्याचा प्रवेश चार राशीच्या लोकांना भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा देईल. जाणून घेऊया अशा कोणकोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांना सूर्याच्या संक्रमणामुळे भरपूर लाभ मिळतात.

मेष राशी

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवस आधी सूर्याचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येईल. त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ होईल. लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन चांगले राहील. आरोग्य चांगले राहील. एखादं रखडलेलं काम या वेळी पूर्ण होण्याची संभावना आहे.

(हे ही वाचा: Mangal Gochar 2022: वृषभ राशीत मंगळाचे संक्रमण; पुढील तीन महिन्यांत या ४ राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ)

कर्क राशी

सूर्य अजूनही कर्क राशीत आहे आणि १७ ऑगस्ट रोजी तो राशी बदलून बाहेर जाईल. कर्क राशीतून सूर्याचे बाहेर पडणे या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. या वेळी बदली, बढती, नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा बदल भविष्यासाठी चांगला ठरेल. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.

सिंह राशी

सूर्य फक्त सिंह राशीत प्रवेश करेल आणि हा बदल सिंह राशीच्या लोकांसाठी भरपूर चांगला सिद्ध होणार आहे. या लोकांना सन्मान मिळेल. कोणतीही समस्या सहज सोडवता येते. पदोन्नती मिळू शकते. करिअरशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या मिळू शकतात. या काळात भरपूर धनलाभ होणार आहे. एखादी नवीन जागा किंवा वाहन या वेळी खरेदी करू शकता.

( हे ही वाचा: Shukra Rashi Parivartan: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ कर्क, कन्या आणि मीन राशींसाठी असेल चांगला काळ; नोकरी आणि व्यवसायात होईल भरभराट)

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण शुभ राहील. त्यांना पैसा मिळेल. करिअरमध्ये खूप फायदे होतील. विशेषत: व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. त्यांचा व्यवसाय चांगला चालेल आणि मोठ्या ऑर्डर मिळण्याची, नफा वाढण्याची देखील शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. कुटंबासोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहीक जीवन सुद्धा सुखाचे जाईल.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Before krishna janmashtami these 4 zodiac signs will get immense money suryadev will have special grace gps

ताज्या बातम्या