scorecardresearch

Chanakya Niti: घरात वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात ‘हे’ संकेत; तुम्हालाही दिसल्यास वेळीच सावध व्हा!

घरात संकट येण्याआधीच काही संकेत मिळू लागतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते..

Chanakya Niti: घरात वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात ‘हे’ संकेत; तुम्हालाही दिसल्यास वेळीच सावध व्हा!
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी केवळ अर्थशास्त्र, राजकारण याविषयी सांगितले नाही आहे तर दैनंदिन जीवनातील त्रास टाळण्यासाठी उपाय देखील सांगितले आहेत. त्यांनी नीतिशास्त्रात जीवनातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी असे देखील काही संकेत सांगितले आहेत जे चांगला आणि वाईट काळ येण्याआधी मिळतात. आचार्य चाणक्य यांनी नितीशास्त्रात सांगितले आहे की, घरात वाईट काळ सुरू होण्याआधी काही संकेत मिळतात. हे संकेत दिसल्यास वेळीच सावध व्हा. आर्थिक संकटांचे लक्षण देणाऱ्या लक्षणाबाबद्दल जाणून घेऊया..

दूध वारंवार सांडणे

घरात दूध वारंवार ओतू जात असेल किंवा काच वारंवार फुटत असेल तर हे आर्थिक संकट येण्याचे संकेत देते. त्यामुळे घरात जर असं वारंवार घडत असेल तर वेळीच सावध व्हा..

घरामध्ये होणारी भांडणे

घरात जर दररोजची भांडणे होत असतील तर हा एक वाईट संकेत आहे. अशा घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. चाणक्याच्या नीतिशास्त्रानुसार ज्या घरात २४तास फक्त क्लेश असतात त्या घरात आर्थिक प्रगती शक्य नाही. त्यामुळेच हेही संकट येण्याची चिन्हे आहेत.

तुळशीचे रोप सुकणे

साधारणपणे प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते आणि तिची पूजा केली जाते. आचार्य चाणक्य नुसार जर घरावर कोणतीही संकटे येणार असतील तर तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकायला लागते. हे देखील आर्थिक संकटाचे लक्षण आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अशावेळी सुकलेले रोप काढून नवीन रोप लावावे.

( हे ही वाचा: पुढील २६ दिवस ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? शनि- सूर्याच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत)

मोठ्यांचा अपमान करणे

आचार्य चाणक्य यांच्यानुसार घरातील सर्व मोठ्यांचा आदर केला पाहिजे. ज्या घरात मोठ्यांचा अपमान होत असेल, त्या घरात वाईट दिवस येणार आहेत हे समजून घ्या. जे लोक मोठ्यांशी वाईट वागतात ते आयुष्यात कधीच सुखी नसतात. घरातील मोठ्यांचा अपमान करणाऱ्यांना कधीच आशीर्वाद मिळत नाही. हे आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाऊ शकते.

घरातील लोकांची झोप कमी होणे

घरातील लोकांची झोप अचानक कमी होणे हे देखील एक वाईट संकेत असू शकते. हे संकेत दाखवून देते की यामुळे घरात आर्थिक संकट येणार आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या