scorecardresearch

Premium

Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना चांगला धनलाभ होणार, जाणून घ्या तुमचे भविष्य

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना जवळचे मित्र भेटतील.

Today Horoscope in marathi
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२३ (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Daily Rashibhavishya in Marathi, 4 December 2023: जाणून घ्या आपल्या राशींसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

shani dev rise in kumbh rashi will show affect on these zodiac signs
Shani Dev : शनिचा लवकरच होतोय उदय ; या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार? अमाप धनसंपत्तीसह मिळेल भरपूर यश
Surya Mangal yuti
१० वर्षांनी ‘आदित्य मंगल’ योग बनल्याने ‘या’ राशी होतील लखपती? सूर्य-मंगळाच्या युतीने तुम्हीही होऊ शकता मालामाल
Shani Maharaj To Stay In Kumbh Rashi For A year Changing Life Money Health Mentality Aquarius Rashi Bhavishya Marathi Today
३६५ दिवस शनीचे वास्तव्य, कुंभ राशीत यंदा बदलणार वारे, स्वामी शनी महाराज तन, मन, धनलाभ कसे बदलतील?
Sagittarius Yearly Horoscope 2024
Sagittarius Yearly Horoscope 2024 : धनु राशीच्या लोकांचे २०२४ हे वर्ष कसे जाईल? कोणत्या महिन्यात चमकेल भाग्य? जाणून घ्या…

वृषभ:-

अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल.

मिथुन:-

आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील.

कर्क:-

कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. कामाचा उरक वाढवावा. सहकार्‍याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील.

सिंह:-

बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.

कन्या:-

आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

तूळ:-

जोडीदारासमवेत वेळ माझे घालवाल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल.

वृश्चिक:-

छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू:-

कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मकर:-

आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.

कुंभ:-

आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

मीन:-

कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Daily horoscope 4 december daily astrology rashi bhavishya in marathi jap

First published on: 03-12-2023 at 19:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×