मेष

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी दिवस योग्य आहे. आनंदी दिवस जाईल. सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम आहे. पशुपक्षांना अन्नदान करावे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदाऱ्या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांना आज सावधपणे निर्णय घ्यावे. ओम क्ली श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

Surya Gochar 2024 in Bharani nakshatra
आता पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने पुढच्या १४ दिवसांत ‘या’ राशी होणार मालामाल
25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?

मिथुन

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. परदेशाशी निगडित नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल. ओम अदभ्यो नमः हा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको. ओम अदभ्यो नमः या मंत्राचा जप ११ वेळा करावा.
आजचा रंग – पोपटी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. व्यवसायाशी निगडित एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. ओम श्री महालक्ष्मै नमः हा जप करावा.
आजचा रंग – निळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. ओम अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – जांभळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. मुलांशी निगडित चांगली वार्ता समजेल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग- जांभळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरुवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते. कुलस्वामिनीचे स्त्रोत्र पठण करावे.
आजचा रंग – तपकिरी

धनु

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. भावंडांशी वादविवाद टाळावेत. वरिष्ठांशी सलोखा राहील. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडित व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांना उत्तम दिवस. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. ग्रामदैवतेचे स्मरण करणे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, आर्थिक जुनी येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. ओम आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.

मीन

आज चंद्राचे संमिश्र भ्रमण आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांशी मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत. दुर्गा कवचाचे पाठ करावेत.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu