मेष

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या भेटीचे योग आहेत. जुने मित्र भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करावे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे.
आजचा रंग – फिकट पिवळा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी निर्माण होतील. त्यांचा पाठपुराव करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. आज शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – राखाडी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. सहकाऱ्यांशी कामगारांशी सलोख्याने वागावे, प्रवास जपून करावा. वादविवाद टाळावेत. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. शनी मंत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – आकाशी

कन्या

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव जाणवेल. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. शनी मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. धाडसी निर्णयाचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवून शकाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. शनी मारुती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्य घराचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. शनी मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – गुलाबी

धनु

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावणे.
आजचा रंग – हिरवा

मकर

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी, वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुतीची उपासना करणे.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यासाठी, आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. मारुतीला पाच दिवे लावावेत.
आजचा रंग – जांभळा

मीन

आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. शनी मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu