मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारूती मंदिरात शेंदूर अर्पण करणे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कामगारांशी जुळवून घ्यावे. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
आजचा रंग – लाल

वृषभ
मारूती मंदिरात स्त्रोत म्हणून दिवसाची सुरूवात करावी. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. नोकरदारांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील.
आजचा रंग – आकाशी

मिथुन
ओम देवेभ्यो नम: हा जप करावा. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत सहलीचे किंवा प्रवासाचे योग. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग – नारंगी

कर्क
ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नम: या मंत्राचा २१ वेळा जप करावा. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. धाडसी निर्णय घेऊ शकाल. भावंडांशी, आप्तेष्ठांशी वाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. पगार वाढ किंवा बदलीसाठी प्रयत्न करावेत. व्यवसायामध्ये कामगिरी उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

सिंह
शनि मारूती मंदिरात तेल व शेंदूर अर्पण करणे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय, नोकरीमध्ये आर्थिक नियोजन करू शकाल. व्यवसायामध्ये नवी संधी उपलब्ध होतील. नवीन गाठीभेटी होतील. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना योग्य दिवस आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – सोनेरी

कन्या
शनि मारूती मंदिरात दर्शन घ्यावे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वाच्या कामांचे निर्णय घ्यावेत. महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी उत्तम ग्रहमान. चांगल्या प्रवासाचे योग येतील. व्यावसायिकांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – पांढरा

तुळ
कालभैरव दर्शन घ्यावे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्याराशीमध्ये आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. स्थावर मालमत्ता, शेअरशी निगडीत मंडळींनी काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक करत असताना मोठ्यांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी.
आजचा रंग – सोनेरी

वृश्चिक
मारूती दर्शन घेणे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. सर्व लाभांसाठी उपयुक्त दिवस. महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करावी. महत्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग.
आजचा रंग – निळा

धनु
मारूतीला शेंदूर अर्पण करणे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. अधिकारवर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील. ज्येष्ठांशी निगडीत सुवार्ता समजेल. कर्जप्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसूल होण्याच्या दृष्टीने चांगला दिवस. नोकरीमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाचा ताण वाढेल.
आजचा रंग – पांढरा

मकर
मारूती दर्शन घेणे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. सुसंधी प्राप्त होतील. नोकरी व्यवसायामध्ये उत्तम सहर्काय लाभेल. परदेशाशी निगडीत व्यापार, नोकरीमध्ये चांगल्या संधी निर्माण होतील. कामाचा ताण वाढेल. प्रवासाचे योग.
आजचा रंग – लाल

कुंभ
हनुमान चालिसा पठण करणे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. प्रवास जपून करावेत. आर्थिक निर्णय घेताना सल्लामसलत करावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी वाद विवाद टाळावेत. स्थावर मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. वात विकार आणि उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
आजचा रंग – आकाशी

मीन
हनुमान चालिसाचे पठण करावे. दुपारी साडेबारानंतर चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – राखाडी

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 6 may
First published on: 06-05-2017 at 01:30 IST