scorecardresearch

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ जानेवारी २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य, रविवार, २९ जानेवारी २०१७
Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी नियोजन करावे. निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दगदगीचा दिवस. ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

वृषभ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घेणे. गृहिणींनी छोट्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. वाहने जपून चालवावीत, नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गुरुमंत्राचा जप करावा.
आजचा रंग – हिरवा.

मिथुन

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गाची मर्जी प्राप्त करू शकाल. नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. कामाचे कौतुक होईल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक ताणतणाव कमी होतील. गणपतीचे स्मरण करावे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ग्रामदैवतांचे दर्शन घेणे. दान करणे.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी उत्तम दिवस आहे. महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामाच्या योजना राबविण्यासाठी, आजचा दिवस उत्तम आहे. गृहिणींना उत्तम दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालावाल. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. गृहिणींनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

तुळ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. नोकरीत मोठी संधी प्राप्त होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – केशरी

धनु

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. मोठे आर्थिक निर्णय घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. उलाढाली जपून कराव्यात वडिलधाऱ्यांची काळजी घ्यावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – राखाडी

मकर

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी, गाठीभेटीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

कुंभ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कुठलेही धाडस करू नये. साधारण दिवस आहे. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. महादेवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – मोरपंखी

मीन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. नवीन महत्त्वाच्या कामांसाठी, जुन्या कामांच्या पाठपुराव्यासाठी गाठीभेटीसाठी, आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तिन्ही प्रहरी करणे.
आजचा रंग – हिरवा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या