मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॐ द्रां दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
आजचा रंग –ऑफ व्हाइट

वृषभ

लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. मोठे व्यावसायिक धाडस करू शकाल. सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहेत. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. व्यावसायिकांचे नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –पिवळा

मिथुन

दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे पदार्थ अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. व्यावसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत. प्रतिष्ठेचे योग संभवतात. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल.
आजचा रंग –नारंगी

कर्क

गणपती पुजन अथर्व शीर्षाचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यावसायिक उलाढाल जपून करावी. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचारविनिमय करावा. प्रवास जपून करावेत. सर्वांशी सलोखा राखावा. मोठी आर्थिक उलाढाल करू नये.
आजचा रंग –पोपटी

सिंह

ॐ श्री दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यावसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -हिरवा

कन्या

दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी, ॐ श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा २१ वेळा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे आणि वाताशी निगडीत आजार संभवतात. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. मोठया आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –जांभळा

तुळ

ॐ श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेवू शकाल. नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल. कुटूंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

ॐ शांभवे नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची काळजी सतावेल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक , फर्निचर, गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत. कुटूंबासमवेत वेळ घालवू शकाल.
आजचा रंग –नारंगी

धनु

ॐ द्रां द्रीं दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल परंतु स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल. कामामध्ये ताणतणाव जाणवेल. नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –पांढरा

मकर

ॐ द्रां द्रीं दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. नवीन योजना राबवू शकाल. व्यावसायिक हितसंबंध दृढ करू शकाल. जुनी येणी वसूल करू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
आजचा रंग –आकाशी

कुंभ

आज पांढऱ्या वस्तूंचे दान दत्त मंदिरात करावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यावसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
आजचा रंग-राखाडी

मीन

दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक , जमिनीचे खरेदीविक्री करणारे व्यावसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी. कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग –नारंगी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 10 may
First published on: 10-05-2018 at 01:49 IST