Guru Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक वेळेनंतर एक राशीतून दुसऱ्या राशीत गमन करीत असतो. सध्या देवगुरू बृहस्पती वृषभ राशीत अस्त झाले असून, त्याचा प्रभाव १२ राशींच्या लोकांवर पाहायला मिळेल. त्यातील काही राशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायी असेल; तर काही राशींच्या लोकांना या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागेल.

हिंदू पंचांगानुसार मंगळवारी (७ मे) देवगुरू बृहस्पती अस्त झाले असून ते ६ जूनपर्यंत याच अवस्थेत असतील. देवगुरू ज्ञान, सुख-समृद्धीचे कारक ग्रह मानले जातात. त्यामुळे पुढच्या २४ दिवसांचा काळ कोणत्या राशींच्या लोकांसाठी लाभदायी ठरेल हे आपण जाणून घेऊ या.

मेष

या राशीच्या व्यक्तींनादेखील वृषभ राशीतील गुरू पुढचे २४ दिवस अनेक उत्तम फळे देईल. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कन्या

गुरू ग्रहाची चाल कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यकारी ठरेल. या राशीच्या व्यक्तींना पुढचे २४ दिवस आनंदात जातील. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. तुम्ही नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ मिळेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा: बुध-सूर्याची चाल, करणार मालामाल! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार

मकर

या राशीच्या लोकांसाठी वृषभ राशीतील गुरू अनेक शुभ फळे घेऊन येईल. पुढचे २४ दिवस आयुष्यात आनंदी आनंद असेल. या राशीच्या व्यक्तींना कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही शुभकार्ये होतील. तसेच तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच बढतीही मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)