scorecardresearch

आजचं राशीभविष्य, बुधवार, २० एप्रिल २०२२

आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको.

मेष:-

धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

वृषभ:-

वायफळ बडबड टाळावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. कामातील बादल लक्षात घ्या. कलेचा आस्वाद घ्याल.

मिथुन:-

जोडीदाराविषयी गैरसमज टाळावेत. भागीदारीत सतर्क राहावे. तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका.

कर्क:-

तरुण लोकांशी मैत्री कराल. दिवस खोडकरपणात घालवाल. सहकार्‍यांवर अवलंबून राहू नका. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.

सिंह:-

वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका. जुगारापासून दूर राहावे. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

कन्या:-

मनाची द्विधावस्था जाणवेल. घरच्या कामाचा ताण जाणवेल. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.

तूळ:-

जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अतीअपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका. मुलांचा विरोध समजून घ्यावा.

वृश्चिक:-

घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल.

धनू:-

आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य वाढेल. क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.

मकर:-

मैत्रीतील आपुलकी वाढेल. फसवणुकीपासून सावध राहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. मत्सराला  बळी पडू नका. आर्थिक लाभाचा दिवस.

कुंभ:-

डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. धाडसाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. अतीघाई बरी नाही.

मीन:-

जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कर्तव्यात कसूर करू नका. हातून चांगले लिखाण होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope today 20 april 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या