आजचं राशीभविष्य, सोमवार, २२ नोव्हेंबर २०२१

आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींची कामाची दगदग वाढेल. स्वत:साठी काही वेळ काढावा.

सर्व बारा राशींसाठीचे आजचे राशीभविष्य

मेष :- 

जवळचा प्रवास कराल. बरेच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. भावंडांची मदत होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.

वृषभ:-

आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. नातेवाईकांच्या गाठी पडतील. स्वत:विषयी फाजील मत बनवू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

मिथुन:-

कामातील उत्साह वाढेल. दिवस आवडीप्रमाणे व्यतीत कराल. पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. उगाचच चिडचिड करू नये.

कर्क:-

उत्साह मावळू देऊ नका. कौटुंबिक कुरबुरीतून मार्ग काढावा. नातेवाईकांचा रूसवा दूर करावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील.

सिंह:-

महत्वाकांक्षेला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. नवीन कामात हात घालाल. आवडीची वस्तू मिळेल. जवळची व्यक्ति भेटेल.

कन्या:-

खर्च जपून करावा. सारासार विचार करूनच खरेदी करावी. बोलतांना भान राखावे. आरोग्यात थोडीफार सुधारणा संभवते. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

तूळ:-

उष्णतेचे त्रास संभवतात. मनात अकारण निराशा निर्माण होऊ देऊ नका. बोलतांना भडक शब्दांचा वापर टाळावा. काही अचानक येणार्‍या जबाबदार्‍या पेलाव्या लागतील. धनलाभाची शक्यता.

वृश्चिक:-

कामाची दगदग वाढेल. स्वत:साठी काही वेळ काढावा. थकवा जाणवेल. काही वेळेस माघार घेणे इष्ट ठरेल. अडथळ्यातून मार्ग काढावा.

धनू:-

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चैनीकडे अधिक कल राहील.  फक्त स्वत: पुरता विचार करू नका. मित्रांशी वाद होऊ शकतात. अधिक कष्ट घेण्याची तयारी ठेवावी.

मकर:-

कामाच्या ठिकाणी वादात अडकू नका. दिवसाची सुरुवात दमदार असेल. एक प्रकारची चुणूक दाखवाल. मनातील योजना आमलात आणाल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील.

कुंभ:-

समतोल साधण्याचा प्रयत्न करावा. धनलाभाची दाट शक्यता. कौटुंबिक बाबीत अधिक लक्ष घालावे. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी.

मीन:-

मनात नसत्या शंका आणू नका. उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी व्हाल. दिवस उत्साहात जाईल. भावंडांशी मनमोकळ्या गप्पा माराल. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आजचे भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Horoscope today 22 november 2021 daily astrology rashi bhavishya in marathi msr

ताज्या बातम्या