Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २७ नक्षत्र, १२ राशी आणि ९ ग्रहांचे वर्णन उपलब्ध आहे. या राशी कोणत्या ना कोणत्या ग्रहाद्वारे शासित आहेत. येथे आपण त्या दोन राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेणार आहोत, ज्यांचे लोक समाजात नाव आणि प्रसिद्धी दोन्ही कमावतात. तसेच, या लोकांना लग्जीरियस जीवन जगायला आवडते. या लोकांवर शुक्रदेवाची विशेष कृपा असते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

वृषभ (Taurus)

या राशीचे लोक पैसे खर्च करण्यात आघाडीवर मानले जातात. या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात. या राशीचे लोक खूप बुद्धिमान मानले जातात. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जास्त पैसे खर्च करतात. पण तरीही त्यांच्याकडे पैशांची कमतरता भासत नाही. कारण ते आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. हे लोक कला जाणकार आणि कलाप्रेमी देखील असतात. त्यांच्या कलागुणांमुळे लोकही त्यांच्याशी जोडले जातात.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

(हे ही वाचा: Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना असते जास्त बोलण्याची सवय! अनेकदा करून घेतात स्वतःचं नुकसान)

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांना आयुष्य अभिमानाने जगायला आवडते. ते शाज पैसे खर्च करतात. तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह सुख आणि सुविधांचा कारक मानला जातो. या राशीची लोक सर्व काही प्रामाणिकपणे करतात. हे लोक कला आणि क्रीडा प्रेमी असतात. त्यांना लग्जीरियस जीवन जगायला आवडते. त्यांच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये म्हणून ते कठोर परिश्रम करतात. ते ब्रँडेड गोष्टींवर भरपूर पैसे खर्च करतात.

(हे ही वाचा: Lunar Eclipse 2022: ‘या’ राशींना चंद्रग्रहणामुळे करिअरमध्ये होऊ शकते प्रचंड प्रगती, धनलाभाचे आहेत योग!)

ज्योतिषशास्त्रात शुक्राचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह भौतिक सुख, वैवाहिक सुख, भोग-विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय, लैंगिक लालसा आणि फॅशन-डिझाइनिंग इत्यादींचा कारक मानला जातो. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे आणि मीन हे त्याचे उच्च राशी आहेत, तर कन्या हे त्याची दुर्बल राशी मानले जाते. २७ नक्षत्रांपैकी शुक्रावर भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाध नक्षत्रांचे राज्य आहे. ग्रहांमध्ये बुध आणि शनि हे शुक्राचे अनुकूल ग्रह आहेत आणि सूर्य आणि चंद्र हे त्याचे शत्रू ग्रह मानले जातात.

(हे ही वाचा: जाणून घ्या कोण होते लाफिंग बुद्धा? त्यांची मूर्ती प्रत्येक घरात का ठेवली जाते?)

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)