Ram Navami 2024 Shubh Yog: रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केले जाते. पंचांगानुसार, रामनवमी १७ एप्रिलला साजरी होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे. धर्मग्रंथानुसार रामजींच्या जन्माच्या वेळी जसे योग जुळून आले होते, तसे या वेळीही तयार होत आहेत. शास्त्रानुसार भगवान श्रीरामाचा जन्म कर्क राशीत झाला आणि यावेळी रामनवमीच्या दिवशी असाच योग तयार होत आहे. अभिजीत मुहूर्तावरही पुन्हा असाच शुभयोग जुळून येत आहे. या दिवशी गजकेसरी योगाचाही प्रभाव राहील. भगवान रामाच्या कुंडलीत सूर्य दहाव्या भावात स्थित आहे आणि उच्च राशीत आहे. राम नवमीच्या दिवशी सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी दहाव्या भावात असेल. अशा स्थितीत शुभ योग जुळून येत आहे. त्यामुळे काही राशींना भगवान रामाच्या कृपेने विशेष लाभ मिळू शकतो.

‘या’ राशींवर भगवान रामाची कृपा?

मेष राशी

दुर्मिळ शुभ योग जुळून आल्याने मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात.

(हे ही वाचा : १८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?)

कर्क राशी

या राशीच्या लोकांना भगवान श्रीरामाचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने तुम्हाला या काळात काही चांगली संधी मिळू शकते. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

तूळ राशी

भगवान श्रीरामाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सर्व कामे आता पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी मिळू शकतात.

(हे ही वाचा : पुढील ६ महिने ‘या’ राशींचे नशीब अचानक पलटणार? ३० वर्षानंतर शनिदेवाने नक्षत्र बदल केल्याने मिळू शकतो चांगला पैसा )

मकर राशी

या काळात मकर राशीच्या लोकांना भगवान श्रीरामाच्या कृपेने मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात.   

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी या काळात त्यांच्या करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)