Mercury Rahu Conjunction in Pisces: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे त्यांचा इतर ग्रहांशी संयोग होतो. यावेळी ग्रहांची युती निर्माण होऊन त्याचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. यासोबतच आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बुधदेवाने वक्री होऊन ९ एप्रिलला मीन राशीत प्रवेश केला आहे. जिथे आधीपासूनच राहू विराजमान आहे. त्यामुळे बुधदेवाच्या प्रवेशाने मीन राशीत बुधदेव आणि राहूची १८ वर्षांनंतर युती झाली आहे. अशा स्थितीत काही राशींना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

‘या’ राशींना होणार मोठा आर्थिक लाभ?

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी राहू आणि बुधदेवाची युती लाभदायी ठरु शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमची आर्थिक बाजूही खूप मजबूत होऊ शकते. या काळात तुमची बचतही वाढू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो.

(हे ही वाचा : २४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा)

तूळ राशी

राहू आणि बुधदेवाची युती तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. जे लोक या काळात आपली नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी नवीन नोकरीची संधी मिळू शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आजारातून आराम मिळू शकतो. अविवाहित असलात तर विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी राहू आणि बुधदेवाची युती वरदानच ठरु शकते. या काळात करिअर आणि व्यवसायात दुप्पटीने फायदा होण्याची शक्यता आहे. बेरोजगार किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना नोकरीची चांगली संधी मिळू शकेल. या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. जे लोक रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगली डील मिळू शकते. धनवृद्धी होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)