Shani Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानण्यात आलंय. त्याच्या प्रत्येक हालचालीचा जवळपास सर्व राशींच्या व्यक्तींवर मोठा प्रभाव पडताना दिसतो. आता शनिदेवाने नक्षत्र परिवर्तन केलं आहे. शनिदेवाने ६ एप्रिल रोजी दुपारी ०३ वाजून ५५ वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. या शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असून मात्र, काही राशी अशा आहेत, ज्यांना या काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या राशी…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृश्चिक राशी

शनिचे नक्षत्र बदल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. शनिदेवाने या राशीच्या चतुर्थ भावात भ्रमण केलं आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. पूर्वीपेक्षा या राशीचे लोक जास्त पैसे कमवू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : शुक्राचे राशी परिवर्तन होताच जुळून आलेत ३ शुभ राजयोग; ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? २३ एप्रिलपर्यंत होऊ शकतात फायदेच फायदे)

धनु राशी

शनिदेवाचे नक्षत्र बदल धनु राशीच्या व्यक्तीसाठी अनुकूल ठरु शकते. शनिदेव या राशीच्या तिसऱ्या भावात भ्रमण करत आहेत. या काळात पैशाची आवक चांगली राहू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही या काळात नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे नक्षत्र बदल वरदानच ठरु शकते. कारण शनिदेव तुमच्याच राशीत भ्रमण करत आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना शुभ परिणाम मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्रीतून लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात अनेक उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. एवढेच नाही तर परदेश दौऱ्यावर जाण्याचीही शक्यता निर्माण होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)