scorecardresearch

३० वर्षांनंतर शनि-शुक्र बनवणार अद्भुत योग! ‘या’ ४ राशींचे नशिब अचानक पालटणार, मिळू शकतो प्रचंड पैसा

Shani- Shukra Gochar: ३० वर्षांनंतर दोन शुभ ग्रहांची युती होत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांसाठी हा योग खूप शुभ ठरणार आहे.

३० वर्षांनंतर शनि-शुक्र बनवणार अद्भुत योग! ‘या’ ४ राशींचे नशिब अचानक पालटणार, मिळू शकतो प्रचंड पैसा
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Saturn Venus Transit: जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत असतात तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात युती म्हणतात. कर्मदाता शनिदेव १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्याच वेळी, रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी दुपारी ०२.२३ वाजता शुक्र देखील कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात शनि आणि शुक्र हे मित्र मानले जातात. तसंच शनिचे मूळ चिन्ह कुंभ आहे. मूलत्रिकोण राशीत सर्व ग्रह पूर्ण प्रभाव देतात. विशेष म्हणजे कुंभ राशीतील या दोन अनुकूल ग्रहांचा संयोग ३० वर्षांनंतर तयार होत आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांसाठी हा योग खूप शुभ ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शनि आणि शुक्राच्या युतीने कोणत्या राशींना शुभ परिणाम मिळतील..

मेष राशीच्या लोकांवर शनि-शुक्र संक्रमणाचा प्रभाव

शनि आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. ही युती तुमच्या कुंडलीच्या अकराव्या घरात तयार होत आहे. हे उत्पन्नाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील किंवा गुंतवलेले पैसे तुम्हाला चांगला नफा देईल. या काळात कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यासोबतच नोकरीत बढती किंवा वाढ होण्याची शक्यता आहे, तर व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची समृद्धी वाढेल.

वृषभ राशीच्या लोकांवर शनि-शुक्र संक्रमणाचा प्रभाव

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि शुक्राचा संयोग जास्त फायदेशीर ठरणार आहे. या युतीचा संयोग तुमच्या दहाव्या घरात होत आहे. म्हणजेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. शनिच्या कृपेने नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन आणि चांगली नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तसेच तुमच्या संपत्तीत वाढ होईल. यावेळी तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता दिसत आहे. गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि व्यवसाय विस्तारासाठी ही योग्य वेळ असेल.

( हे ही वाचा: ७ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनि- गुरूच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा)

सिंह राशीच्या लोकांवर शनि-शुक्र संक्रमणाचा प्रभाव

या राशीसाठी शनि आणि शुक्र त्यांच्या सातव्या घरात एकत्र आहेत. शुक्र सातव्या घराचा स्वामी मानला जातो. या काळात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात गोडवा येईल आणि या काळात तुमचे लग्न होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन लोकांना भेटाल, नवीन संबंध निर्माण कराल किंवा नवीन व्यवसाय सुरू कराल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या पत्नीचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि परस्पर संबंध चांगले होतील. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल.

मकर राशीवर शनि-शुक्र संक्रमणाचा प्रभाव

मकर राशीसाठी शनि आणि शुक्राचा संयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात ही युती तयार होत आहे. या काळात तुम्हाला तुम्हाला विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळेल आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसंच या काळात तुम्हाला वडिलोपार्जित किंवा कौटुंबिक संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. या दरम्यान, कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असेल आणि तुम्हाला कुटुंबासाठी वेळ मिळेल. याकाळात तुमच्या बोलण्याचा चांगला उपयोग करा, तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. तुम्ही कोणाचेही मन जिंकू शकता. मार्केटिंग, विक्री इत्यादींशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 14:25 IST

संबंधित बातम्या