Premium

२०२४ मध्ये पालटणार ‘या’ राशींची कुंडली, २०२५ पर्यंत शनी राहू देणार धनलाभ, यशात ‘हा’ गुरु ठरेल पाठबळ

Shani Rahu Graha Yuti: २०२४ च्या सुरुवातीलाच शनी व राहूच्या या युतीला गुरुचे पाठबळ मिळणार असल्याने तुम्हाला आयुष्यात अनपेक्षित वेग जाणवू शकतो. नेल्या कोणत्या राशीवर हे ग्रह मेहेरबान असणार आहेत हे जाणून घेऊया..

Shani Rahu Guru Positive Effect Non Expecting Changes In Kundali Of Three Zodiac Signs These Person May Bring Huge Money Power
दोन वर्ष शनी- राहू बनतील 'या' राशींचे धनगुरू (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Rahu Guru Positive Effect: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. ज्याचा प्रभाव १२ राशींवर शुभ- अशुभ प्रकारात होत असतो. तुमच्या राशीचे स्वामी व ग्रहाची कुंडलीतील स्थिती यानुसार तुमच्या रोजच्या आयुष्यात नेमका किती प्रमाणात प्रभाव दिसून येऊ शकतो हे ठरत असते. २०२३ च्या शेवटाकडे शनीने राहूच्या नक्षत्रात प्रवेश करून अशी काही युती केली आहे की २०२४ च नव्हे तर २०२५ पर्यंत तीन राशींच्या आयुष्यात प्रचंड प्रगती व धनलाभाचे योग दिसून येत आहेत. २०२४ व २०२५ या दोन वर्षात या तीन राशी प्रचंड पैसे कमावून कोट्याधीश होऊ शकतात. २०२४ च्या सुरुवातीलाच शनी व राहूच्या या युतीला गुरुचे पाठबळ मिळणार असल्याने तुम्हाला आयुष्यात अनपेक्षित वेग जाणवू शकतो. नेल्या कोणत्या राशीवर हे ग्रह मेहेरबान असणार आहेत हे जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्ष शनी- राहू बनतील ‘या’ राशींचे धनगुरू

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या मंडळींना तिन्ही ग्रहांची शुभ स्थिती अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. २०२४ मध्ये गुरु मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत मात्र सरतेशेवटी प्रभाव इतका तीव्र असेल मेष राशीच्या मंडळींना प्रत्येक पावलावर धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने तुमच्या मनावरील ताण हलका होण्यासाठी मदत होऊ शकते. जुन्या शिक्षकांशी गाठभेट होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्याला नव्याने कलाटणी घेणारी एखादी स्थिती उद्भवू शकते. तुमचे निर्णय घेताना हितशत्रूंशी चर्चा टाळावी. आपल्या योजना विनाकारण इतरांना सांगणे टाळावे यामुळे अडथळेच निर्माण होऊ शकतात.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

२०२५ पर्यंत वृषभ राशीवर गुरुकृपा असणार आहे. शनीदेव करिअरमध्ये प्रगतीसाठी संधी देऊ शकतात. स्वतःच्या मनावर विश्वास ठेवावी लागेल. जबाबदाऱ्या झटकू नका.तुमच्या आत्मविश्वासावर काम करा, वाणीमध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्याने अनेक प्रश्न सुटू शकतात. अनोळखी क्षेत्रात काम करण्याची ओढ लागू शकते. अध्यात्माची तुम्हाला रुची वाटेल. तुमच्या नशिबात वैवाहिक सुखाचे संकेत आहेत. अविवाहित मंडळींना किंवा लग्नासाठी उत्सुक व्यक्तींना स्थळ चालून येऊ शकते. नव्याने आयुष्यात जोडल्या गेलेल्या व्यक्तीमुळे धनलाभाचे योग आहेत.

हे ही वाचा<< २७ डिसेंबरला बुध उदयासह ‘या’ राशींचा होणार भाग्योदय; २०२४ मध्ये प्रचंड पैसे व आनंदाने भरून जाईल ओंजळ

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीसाठी २०२४ ते २०२५ हा कालावधी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. व्यवसायात वृद्धीची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी आजवर तुम्ही ज्या समस्यांना तोंड देत होतात त्या तुमच्या वाटेतून बाजूला होऊ शकतात. तुम्ही आर्थिक मिळकत कामाव्यक्तिरिक्त इतर स्त्रोतांमधून वाढू शकते. शेअर बाजारात तुमची नशीब जोरदार सिद्ध होऊ शकते. परदेश यात्रेचे योग आहेत. तुम्हाला आई वडिलांच्या सल्ल्याचा खूप फायदा होऊ शकतो. चिडचिड टाळावी. समजूतदारपणा तुम्हाला प्रचंड यश व धनप्राप्ती करून देऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani rahu guru positive effect non expecting changes in kundali of three zodiac signs these person may bring huge money power svs

First published on: 07-12-2023 at 16:50 IST
Next Story
१०० वर्षानंतर दोन ‘शुभ राजयोग’ जुळून आल्याने जानेवारीपासून ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? बुधदेव देऊ शकतात बक्कळ पैसा