कुंडलीतील ग्रह-नक्षत्र, हाताच्या रेषा, जन्मतारीख, शरीरावरील तीळ इत्यादींवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व-भविष्य जाणून घेता येते. त्याचप्रमाणे लोकांची बसण्याची आणि चालण्याची पद्धतही बरेच काही सांगून जाते. आज आपण खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याची पद्धत जाणून घेणार आहोत. हा देखील देहबोलीचा एक भाग आहे.

बसण्याच्या पद्धतीने तुमची वरून जाणून घ्या व्यक्तीची खासियत

  • जे खुर्चीवर बसताना गुडघे जवळ ठेवतात, पण तळाशी पाय एकमेकांपासून दूर ठेवतात. अशा लोकांमध्ये जबाबदारीची जाणीव कमी असते. अडचणी समोर येताच हे लोक पळ काढतात. तथापि, या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते आणि ते स्पष्टवक्ते असतात.
  • जे लोक क्रॉस-पाय ठेवून बसतात किंवा एकावर एक पाय ठेवून बसतात ते सर्जनशील, सभ्य आणि लाजाळू असतात. हे लोक मुक्तपणे जीवनाचा आनंद घेतात. पण जे करणे त्यांना योग्य वाटत नाही, ती कामे ते कधीही करत नाहीत.

सोने-चांदीच्या दागिन्यांसोबत जोडलेल्या आहेत ‘या’ शुभ-अशुभ गोष्टी; हरवल्यास होऊ शकते मोठे नुकसान

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
  • जे लोक खुर्चीवर बसताना गुधाडे एकमेकांपासून लांब ठेवतात पण खाली पाय एकमेकांजवळ ठेवतात, त्यांना आरामदायी जीवन जगणे आवडते. असे म्हणता येईल की कठोर परिश्रम करणे त्यांना जमत नाही. हे लोक एकाग्र होऊ शकत नाहीत, त्यांचे मन सतत भरकटते.
  • जे लोक खुर्चीवर बसताना आपले पाय गुढग्यापासूनच सरळ रेषेत आणि जवळजवळ ठेवून बसतात, ते शिस्तबद्ध जीवन जगतात. हे लोक वक्तशीर आणि आत्मनिरीक्षण करणारे असतात. ते नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. हे लोक बेजबाबदार आणि अपमानास्पद वागणूक सहन करू शकत नाहीत.
  • असे लोक जे दोन्ही पाय चिकटवून तिरके बसतात, हे लोक हट्टी पण छान असतात. ते खूप महत्त्वाकांक्षी असून आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असतात.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)